Weather Report : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Chance of torrential rain in sparse places in Konkan Goa, Central Maharashtra पुण्यात हलका स्वरुपाचा तर मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – गोवा दक्षिण केरळ किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम असून, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊसाची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

कोकण आणि गोवा : म्हापसा, वेंगुर्ला 14 प्रत्येकी, सावंतवाडी 13, पेडणे 12, कुडाळ 11, मुरुड 8, मालवण 7, कानाकोन, वसई 6 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), देवगड, कणकवली, मार्मगोवा, 5 प्रत्येकी, गुहागर 4, अलिबाग, बेलापूर (ठाणे), भिरा, दोडा मार्ग, माथेरान, म्हसळा, रत्नागिरी, रोहा, संगमेश्वर देवरुख, शहापूर, श्रीवर्धन, सुधागड, विक्रमगड 3 प्रत्येकी, डहाणू, दापोली, हर्णे, महाड, माणगाव, मुंबई (सांताक्रूझ), ठाणे, उरण 2 प्रत्येकी, अंबरनाथ, जव्हार, कल्याण, खेड, लांजा, मंडणगड, मडागव, मोखेडा, पनवेल, पेन, केपे, रामेश्वर कृषी, सांगे, उल्हासनगर, वैभववाडी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : ओझरखेडा 3, वेल्हे 2, महाबळेश्वर, पेठ, राधानगरी 1 प्रत्येकी.

विदर्भ : भामरागड 3, अहीरी, आमगाव, गोरेगाव, मुल चेरा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (नवजा), इंगरवाडी, शिरगाव, ताम्हिणी, भिरा, धारावी 3 प्रत्येकी, दावडी 2, अम्बोणे 1

पुढील हवामानाचा अंदाज

12 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

13 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

14 – 16 जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

इशारा 

12 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. दक्षिण महाराष्ट्र – गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

13 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

14-15 जुलै : कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

16 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

पुण्यात हलका स्वरुपाचा तर मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.