Weather Report: कोकण-गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

Weather Report: Chance of torrential rain in sparse places in Konkan-Goa, Vidarbha कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – येत्या दोन दिवसांत कोकण – गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: जव्हार, लांजा, सांगे 5 प्रत्येकी, महाड, पालघर, केपे, सावंतवाडी, वडा 4 प्रत्येकी, भिरा, कानकोना, डहाणू, दोडामार्ग, माथेरान, म्हसळा, मोखेडा, उल्हासनगर.

विक्रमगड 3 प्रत्येकी, अंबरनाथ, भिवंडी, गुहागर, कल्याण , खालापूर, मंडणगड, माणगांव, मारमागोवा, मुंबई (सांताक्रूझ), मुरुड, पनवेल, पेण, पोलादपूर, शहापूर, तलासरी, ठाणे, वेंगुर्ला 2 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), चिपळूण, कणकवली, कर्जत, खेड, कुडाळ, मालवण, मुरबाड, पणजी (गोवा), राजापूर, रत्नागिरी, रोहा, संगमेश्वर देवरुख, सुधागड पाली, उरण, वैभववाडी, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: गगनबावडा 9, इगतपुरी 7, महाबळेश्वर 5, लोणावळा (कृषी), नवापुर 4 प्रत्येकी, पन्हाळा, पेठ, राधानगरी, वेल्हे 3 प्रत्येकी, अक्कलकुवा, हर्सूल, रावेर, शाहूवाडी.

सुरगाना, त्र्यंबकेश्वर 2 प्रत्येकी, आजारा, अकोले, भोर, जावली मेधा, ओझरखेडा, पारोळा, पाटण, शहादा, शिरपूर, सिंदखेडा, तळोदा 1 प्रत्येकी.

विदर्भ: सडक अर्जुनी 8, देवरी 6, गोरेगाव 5, देसाईगंज, कुरखेडा 4 प्रत्येकी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, धानोरा, कोरची, सालेकसा, तिरोरा 3 प्रत्येकी, आर्मोरी, ब्रम्हपुरी, कुही.

साकोली 2 प्रत्येकी, अहीरी, भामरागड, भिवापूर, एटापल्ली, गडापीरी लाखंडूर, पौनी, सोली, सिरोंचा 1 प्रत्येकी.

घाटमाथा: कोयना(नवजा) 11, ताम्हिणी 9, अम्बोणे, शिरगाव 7 प्रत्येकी, दावडी 6, डोंगरवाडी, लोणावळा (ऑफिस), लोणावळा (टाटा) 4 प्रत्येकी, खंद, खोपोली, वाणगाव, वळवण 3 प्रत्येकी, कोयना (पोफळी), ठाक्रवाडी, शिरोटा, भिवपुरी 2 प्रत्येकी.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलावः तुलसी, वैतरणा 5 प्रत्येकी, मध्य वैतरणा 4, भातसा, अप्पर वैतरणा, विहार 3 प्रत्येकी, तानसा 1

पुढील हवामानाचा अंदाज:

10 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

11 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

12 ऑगस्ट: कोकण गोवा बहुतांश ठिकाणी, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

13 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

09 ऑगस्ट: विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर कोकण गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

10-13 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.