Weather Report: मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पुणे परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Weather Report: Chance of torrential rain in sparse places in Marathwada, forecast of light to moderate rain in Pune area

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत (शुक्रवारी) मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर पुणे शहर व परिसरात मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. 

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल राजस्थानच्या आणखी काही भागात, उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशच्या उर्वरित भागात, दिल्लीच्या संपूर्ण भागात, हरियाणाच्या काही भागात व पंजाबच्या बहुतांश भागात झाली आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान: मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, कोंकण गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: भिरा, कानकोन, दाभोलीम (गोवा), मडगाव, मार्मगोवा, पणजी (गोवा) 1 प्रत्येकी.
मध्य महाराष्ट्र: गिरना (धरण) 9, मालेगाव 3, अहमदनगर, पारोळा, श्रीरामपूर 2 प्रत्येकी, अमळनेर, इगतपुरी, पुणे (पाषाण), सिंधखेडा 1 प्रत्येकी.
मराठवाडा: औरंगाबाद 6, अंबड 5, लोहा 4, बदनापूर, गंगापूर, हिमायतनगर 3 प्रत्येकी, आष्टी, भोकरदन, बिलोली, उमारी 2 प्रत्येकी, कळमनुरी, मुदखेड, परभणी, सोयेगाव, वैजापूर 1 प्रत्येकी.
विदर्भ: नागपूर 6, कामठी 4, हिंगणा, पारशिवनी, संग्रामपूर 2 प्रत्येकी, अकोला, अकोट, भिवापूर, चांदूर बाजार, चिखलदरा, चिमूर, हिंगणघाट, कुही, मारेगाव, पवनी, रामटेक, सिंधखेडराजा, उमरेड, वर्धा 1 प्रत्येकी.
घाटमाथा: भिरा 1.

पुढील हवामानाचा अंदाज:

25 जून: कोंकण गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
26 जून: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
27 जून: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.
28 – 29 जून: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा :

25-26 जून: मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.
27 जून: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.
28-29 जून: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.