Weather Report: उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

कोकण, गोवा तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण, गोवा तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा: अलिबाग 14, तलासरी 13, माथेरान 12, कर्जत 11, जाभार, खेड, पालघर, पनवेल, सुधागड पाली 9 प्रत्येकी, खालापूर, माणगाव, पेण, केप, उरण, वैभववाडी 8 प्रत्येकी, अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, कणकवली, मंडणगड, पोलादपूर, सावंतवाडी, विक्रमगड 7 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), डोडा मार्ग 6 प्रत्येकी, डहाणू, कुडाळ, महाड, मुंबई (सांताक्रूझ) , पेडणे, रोहा, सांगगे, ठाणे 5 प्रत्येकी, चिपळूण, मडगाव, मार्मगोवा, उल्हासनगर, वसई, वाडा 4 प्रत्येकी, भिरा, कानकोन, हरनाई, मालवण, म्हसळा, मोखेडा एफएमओ, मुरुड, संगमेश्वर देवरूख, शहापूर 3 प्रत्येकी, मुरबाड, पणजी (गोवा), राजापूर, रत्नागिरी, वेंगुर्ला 2 प्रत्येकी, दाभोलिम (गोवा), देवगड, गुहागर, लांजा, श्रीवर्धन 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: लोणावळा (कृषी) 11, गगनबावडा 8, खंडाळा बावडा , महाबळेश्वर 7 प्रत्येकी, इगतपुरी, शिरपूर, वडगाव मावळ 6 प्रत्येकी, पौड मुळशी, पेठ, वेल्हे 5, चांदगड, गिधाडे, ओझरखेडा, राधानगरी 4 प्रत्येको, अमळनेर, भोर, हर्सूल, जावली मेधा, शहादा, सिंद खेडा, सुरगणा, तळोदा, यावल 3 प्रत्येकी, आजारा, आंबेगाव घोडेगाव, चोपडा, धारणगाव, एरंडोल, जळगाव, कळवण, खेड राजगुरूनगर, नंदुरबार, पन्हाळा, पारोला, रावेर, त्र्यंबकेश्वर, वाई 2 प्रत्येकी, अकोले, भडगाव, बोदवड, दहीगाव, देवळा, धाडगाव, दिंडोरी, गारगोटी / भुदरगड, गिरना धरण, जुन्नर, कागल, मुक्ताईनगर, नांदगाव, नवापूर, निफाड, ओझर (नाशिक एपी), पाटण, पुणे बागलाण, शाहूवाडी, शिराळा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: खुलताबाद, वैजापूर 2 प्रत्येकी, औरंगाबाद एपी, बिलोली, गंगापूर, जालना, नायगाव खैरगाव, फुलंब्री, सिल्लोड, सोयेगाव, उमरगा 1 प्रत्येकी.

विदर्भ: धरणी 2, अंजनगाव, आष्टी, चांदूर बाजार, चिखलदरा, देवरी, एटापल्ली, कामठी, काटोल, कोरची, मोडा, नरखेडा, परतवाडा, पारशिवनी, रामटेक, संग्रामपूर, तेल्हारा 1 प्रत्येकी.

घाटमाथा: दावडी 5, शिरगाव, इंगरवाडी 14 प्रत्येकी, ताम्हिणी 12, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), वळवण, अम्बोणे 11 प्रत्येकी, खोपोली 10, खंद 9, वाणगाव 7, भिवपुरी 6, ठाकूरवाडी, कोयना (पोफळी) 5 प्रत्येकी, शिरोटा 4, कोयना (नवजा) 3

पुढील हवामानाचा अंदाज :

31 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

01 सप्टेंबर: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

02 सप्टेंबर: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

03 सप्टेंबर: कोकण गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

31 ऑगस्ट: उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

01-03 सप्टेंबर: काही नाही.

पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.