Weather Report : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

Weather Report: Chance of torrential rains in Central Maharashtra and Marathwada पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच अधून मधून जोरदार सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 

एमपीसी न्यूज – मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच,  कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : रत्नागिरी 9, भिरा, चिपळूण 8 प्रत्येकी, राजापूर 6, संगमेश्वर देवरूख 5 प्रत्येकी, दापोली, ठाणे 4 प्रत्येकी, हर्णे, मालवण, पोलादपूर, सुधागड-पाली, उल्हासनगर, विक्रमगड, वाडा 3 प्रत्येकी, अलिबाग, अंबरनाथ, गुहागर, जव्हार, कल्याण, लांजा, मुंबई (कुलाबा), शहापूर, वसई 2 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), डहाणू, खेड, महाड, मुरबाड, मुरुड, पालघर, सांगे, श्रीवर्धन 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 7, नंदुरबार, बागलाण, शिरपूर 6 प्रत्येकी , मालेगाव, श्रीगोंडा, सोलापूर, तळोदा 5 प्रत्येकी, अक्कलकोट, कर्जत, शहादा 4 प्रत्येकी, अकोले, चांदवड, इगतपुरी, कळवण, खंडाळा बावडा, मोहोळ, नेवासा, निफाड, पुणे 3 प्रत्येकी , दौंड, इंदापूर, मंगळवेढा, पंढरपूर, पारनेर, साक्री, सातारा, शिरूर घोडनाडी, श्रीरामपूर 2 प्रत्येकी, अक्कलकुवा, अमळनेर, चाळीसगाव, दहिवडी माण, देवळा, कडेगाव, कराड, लोणावळा (कृषी), नांदगाव, पलूस, पन्हाळा, पाथर्डी, पुरंदर सासवड, सिन्नर, सुरगणा, वेल्हे, वाई, यावल 1 प्रत्येकी.

मराठवाडा: पाथरी, सिल्लोड 7 प्रत्येकी, जाफराबाद 6, आंबड 5, बदनापूर, कळमनुरी, मानवत, फुलंब्री 4, जळकोट, उस्मानाबाद, सोयेगाव 3 प्रत्येकी, औसा, निलंगा 2 प्रत्येकी, देवणी, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, नांदेड, परभणी, पाटोदा, सेनगाव, सोनपेठ, वसमत  प्रत्येकी.

विदर्भ: बुलढाणा, चिखली 4 प्रत्येकी, भामरागड, मुल चेरा 3 प्रत्येकी, बाळापूर, देऊळगाव राजा, एटापल्ली, खामगाव, लोणार, मेहकर, पातूर 2 प्रत्येकी, चिखलदरा, दर्यापूर, जळगाव जामोद, खारंघा, मालेगाव, मानोरा, मोताळा, नरखेडा, राजुरा, रिसोड, सिंदखेड राजा, वरोरा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : डोंगरवाडी 7, ताम्हिणी 4, खोपोली, शिरगाव 3 प्रत्येकी, कोयना (नवजा), दावडी 2 प्रत्येकी, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), ठाकूरवाडी, वळवण, वाहनगाव, अम्बोणे 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

26 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

27 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

28 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश, विदर्भात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

26 जुलै : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी  मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्र  किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

28 जुलै : विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच अधून मधून जोरदार सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.