Weather Report : कोंकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोंकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त)

 

कोकण आणि गोवा : चिपळूण 15, गुहागर 12, कणकवली 6, वैभववाडी 3, खालापूर, लांजा, संगमेश्वर देवरुख 1 प्रत्येकी

मध्य महाराष्ट्र : गाडहिंग्लज, पेठ 4 प्रत्येकी, यावल 3, कोल्हापूर, ओझर (नाशिक एपी), पाटण 2 प्रत्येकी, देवळा, दिंडोरी, हातकणंगले, कागल, महाबळेश्वर, पन्हाळा, सिन्नर 1 प्रत्येकी

मराठवाडा : पैठण 1

पुढील हवामानाचा अंदाज :

03-04 ऑक्टोबर: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

05 ऑक्टोबर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

06 ऑक्टोबर कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

07 ऑक्टोबर विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा :

03-04 ऑक्टोबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची
शक्‍यता.

05 ऑक्टोबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

06-07 ऑक्टोबर: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.