Weather Report : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा तर मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, पुणे वेधशाळेचा अंदाज

एमपीसी न्यूज – ​येत्या 24 तासातकोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता. पुणे परिसरात मेघगर्जना​ व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तर मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून माध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: वैभववाडी 71, मुंबई (कुलाबा) 33, उरण 32, रोहा 30, भिरा 29, पालघर 26, माथेरान, श्रीवर्धन 24 प्रत्येकी, मंडणगड 23, माणगाव, पनवेल, पेण 22 प्रत्येकी, मुरुड, सुधागड, पाली 21 प्रत्येकी, म्हसाळा 20, महाड, पोलादपूर, ठाणे 18 प्रत्येकी, अलिबाग, दापोली 17 प्रत्येकी, पेडणे 15, हर्णे 14, बेलापूर (ठाणे), दोडा मार्ग, कल्याण, वाडा 13 प्रत्येकी, चिपळूण, उल्हासनगर 12 प्रत्येकी, भिवंडी, कर्जत, खेड 11 प्रत्येकी, कणकवली 10, डहाणू, गुहागर, खालापूर, लांजा, राजापूर, संगमेश्वर देवरूख 9 प्रत्येकी, कानकोन 8, अंबरनाथ, सावंतवाडी, वाल्पोई, वसई 7 प्रत्येकी, मालवण, रत्नागिरी, सांगे 6 प्रत्येकी, कुडाळ, केपे, शहापूर 5, देवगड, जव्हार, म्हापसा, वेंगुर्ला, विक्रमगड 4 प्रत्येकी, मुरबाड 3, मार्मगोवा, पणजी (गोवा), तलासरी 2 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: राधानगरी 23, गगनबावडा 21, महाबळेश्वर 19, आजरा 18, चांदगड 17, लोणावळा (कृषी) 16, वेल्हे 13, कागल, पन्हाळा 12 प्रत्येकी, कोल्हापूर 11 प्रत्येकी, गडहिंग्लज, शाहूवाडी 9 प्रत्येकी, दिंडोरी 8, भोर, पोड मुळशी, शिरपूर 7 प्रत्येकी, निफाड, पाटण 6 प्रत्येकी, इगतपुरी, पेठ, शिराळा, शिरोळ, तळोदा 5 प्रत्येकी, अक्कलकुवा, अकोले, जावळी मेधा, कराड, कोपरगाव, कोरेगाव, मालेगाव, मिराज, नंदुरबार, रावेर, सांगली, बागलाण, सिंधखेडा, वडगाव मावळ, वाई 3, कडेगाव, कवठे महाकाळ, खंडाळा बावडा, रहाटा, सातारा, सुरगणा, तासगाव, त्र्यंबकेश्वर, वाळवा इस्लामपूर 2 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, भुसावळ, एरंडोल, जाट, कळवण, खटाव वडूज, नवापूर, पलूस, पुणे (पाषाण), पुरंदर सासवड, सिन्नर, विटा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: अंबाड 3, गंगाखेड, घनसावंगी, जाफराबाद, सेलू, उमरगा 2 प्रत्येकी, जालना, किनवट, लोहारा, मुदखेड, परांडा, परतूर, तुळजापूर 1 प्रत्येकी.

विदर्भ: गोरेगाव 15, आमगाव 12, पारशिवनी 7, गोंदिया, रामटेक, सोंनेर 6, नागपूर एपी, उमरेड 5, हिंगणा, लाखंदूर 4 प्रत्येकी, भंडारा, कलमेश्वर, कुही, मोहाडी, पौनी, सडक अर्जुनी, सालेकसा, तुमसर 3 प्रत्येकी, अकोला, आर्वी, काटोल, लाखनी, मोंदा, मुल चेरा, नांदगाव काजी, नरखेडा, संग्रामपूर, सेलू, तिरोरा, वरुड 2 प्रत्येकी, अंजनगाव, अर्जुनी मोरगाव, आष्टी, भिवापूर,

घाटमाथा: ताम्हिणी 33, कोयना(नवजा) 30, शिरगाव, इुंगरवाडी 28 प्रत्येकी, दावडी, अम्बोणे 27 प्रत्येकी, कोयना (पोफळी) 19, लोणावळा(टाटा) 17, लोणावळा(ऑफिस) 15, खोपोली 14, वळवण 11, शिरोता, वाहनगाव 6 प्रत्येकी, खांड 5 भिवपुरी, ठाकूरवाडी 4 प्रत्येकी.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: तुलसी 22, विहार 16, तानसा 8, भातसा 6, वैतरणा 4, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा 3 प्रत्येकी,

पुढील हवामानाचा अंदाज:

07 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

08-09 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

10 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

07 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

08 ऑगस्ट: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

09 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

10 ऑगस्ट: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.