Weather Report: कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

Weather Report: Chance of torrential rains in Konkan-Goa, Central Maharashtra गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: वेंगुली 5, दापोली 4, कानकोन, कणकवली, मालवण, पेडणे, सावंतवाडी 3 प्रत्येकी, भिरा, दाभोलीम (गोवा), देवगड, दोडा मार्ग, गुहागर, हर्णे, खेड, कुडाळ, फोंडा, राजापूर, वैभववाडी 2 प्रत्येकी, लांजा, मंडणगड, म्हापसा, मार्ममागोवा, केपे, रामेश्वरग्री, रत्नागिरी, सांगे 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: गगनबावडा, महाबळेश्वर 3 प्रत्येकी, इगतपुरी, कवठे महाकाळ 2 प्रत्येकी, खटाव वडूज, मुळदे, पन्हाळा, शेवगाव, सुरगाणा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: बीड, लोहा 4 प्रत्येकी, पालम, उमरगा 3 प्रत्येकी, हदगाव, जाफराबाद 2 प्रत्येकी, औरंगाबाद, भोकरदन, बिल्लोली, गंगाखेड, लोहारा, मुदखेड, पाथरी, फुलंब्री, वसमत प्रत्येकी.

विदर्भ: ब्रम्हपुरी 5, लाखंदूर 4, चिमूर 3, आमगाव, भिवापूर, धानोरा, पौनी, साकोली, सावनेर 2 प्रत्येकी, गोंदिया, गोंड-पिपरी, कुही, कुरखेडा, मौदा, नाग भीर, सडक अर्जुनी, उमर खेड 1 प्रत्येकी.

घाटमाथा: कोयना (नवजा) 2, खोपोली, इंगरवाडी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

02 ऑगस्ट: कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

03 ऑगस्ट: कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

04-06 ऑगस्ट: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

02 ऑगस्ट: कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

03 ऑगस्ट: कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

04-05 ऑगस्ट: कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

06 ऑगस्ट: कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात येत्या 24 तासांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.