Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता

एमपीसी न्यूज – गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: अलिबाग, मुंबई (कुलाबा) 9 प्रत्येकी, अंबरनाथ, भिवंडी, वसई 7 प्रत्येकी, मालवण, मुरुड, उल्हासनगर, विक्रमगड 5 प्रत्येकी, खालापूर 4, दोडामार्ग, म्हापसा, पेडणे, केपे, रामेश्वर कृषी, उरण 3 प्रत्येकी, डहाणू, देवगड, कर्जत, माथेरान, म्हसळा, श्रीवर्धन, ठाणे, वाडा 2 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), गुहागर, जव्हार, कल्याण, कुडाळ, महाड, मडगाव, मोखेडा, पालघर, पणजी (गोवा), पनवेल, सावंतवाडी, तलासरी , वैभववाडी, वेंगुर्ला 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: पाथर्डी 5, बार्शी , ओझरखेडा 3, बारामती, चाळीसगाव, दहिवडी माण, गगनबावडा, जामखेड, मंगळवेढा, पेठ, राहुरी, रावेर, शेवगाव, सोलापूर 2 प्रत्येकी, हर्सूल, इगतपुरी, लोणावळा (कृषी), मोहोळ, नेवासा, सुरगाणा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: देवणी 8, चाकूर 4, शिरूर अनंतपाल 5 प्रत्येकी, वसमत 4, अर्धापूर, परतूर, पूर्णा 3 प्रत्येकी, जिंतूर, किनवट, सेलू, सोयगाव २ प्रत्येकी, आष्टी, औंधा नागनाथ, औसा, धर्मबाद, गंगाखेड, गंगापूर, कैज, कळमनुरी, लातूर, माहूर, नांदेड, निलंगा, पालम, परभणी, पाटोदा, रेणापूर, उमारी 1 प्रत्येकी.

विदर्भ: पोंभुणी 9, बाभुळगाव, मानोरा, वरोरा 6, बल्लारपूर, भद्रावती, नांदगाव काजी, सेलू 5 प्रत्येकी, आर्णी, चंद्रपूर, दारव्हा, गोंड पिपरी, कोरपना, मुल 4 प्रत्येकी, अहीरी, अमरावती, आर्वी, बाळापूर, चामोर्शी, देवळी, धामणगाव, दिग्रस, एटापल्ली, घाटंजी, हिंगणा, जिवती, कारंजा लाड, मंगळुरपीर, नेर, पातूर, समुद्रपूर, यवतमाळ 3 प्रत्येकी, अकोला, भामरागड, चांदूर, चिमूर, धानोरा, गडचिरोली, गोंदिया, हिंगणघाट, कळंब, खामगाव, मात्रेगाव, सडक अर्जुनी, सिरोंचा, वणी, झरी झमानी 2 प्रत्येकी, अंजनगाव, आर्मोरी, बार्शी टाकळी, बटकुली, भिवापूर, चांदूर बाजार, दर्यापूर, कळमेश्वर, खारंगा, कोरची, महागाव, मेहकर, मोहाडी, मुलचेरा, मूर्तिजापूर, पौनी , राळेगांव, सोली, सावनेर, शेगाव, शिंदेवाही, उमरेड 1 प्रत्येकी.

घाटमाथा: खोपोली 3, कोयना (नवजा), शिरोटा, लोणावळा(टाटा) 2 प्रत्येकी, कोयना (पोफळी), अम्बोणे, लोणावळा(ऑफिस) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:
29 जुलै – 02 ऑगस्ट: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:
29 जुलै: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.
30 जुलै: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.
31 जुलै: कोकण गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
01 ऑगस्ट: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
02 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.