Weather Report : पुण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता

एमपीसी न्यूज – पुणे आणि परिसरात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे तर, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : सांगे 18, फोंडा 13, केप, वाल्पोई 12 प्रत्येकी , वैंगुली 11, मडगाव, श्रीवर्धन 9, कानकोना, दोडामार्ग, पेडणे, सावंतवाडी 8 प्रत्येकी, संगमेश्वर देवरुख 7, भिरा, दाभोलिम (गोवा) 6 प्रत्येकी, चिपळूण, वैभववाडी 5 प्रत्येकी, कणकवली, कर्जत, मालवण, राजापूर 4 प्रत्येकी, खेड, कुडाळ, मार्मागोवा 3, म्हापसा, माथेरान, रत्नागिरी, रोहा, सुधागड पाली 2 प्रत्येकी, देवगड, हरनाई, खालापूर, लांजा, पेण, रामेश्वरगरी, ठाणे 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : आजारा 5, खेड राजगुरूनगर, शिरपूर 4, दहिवडी, नंदुरबार, पुरंदर सासवड 3, भोर, धाडगाव, जामखेड, करमाला, नेवासा, ओझर (नाशिक एपी), शहादा, श्रीगोदा, विटा 2 प्रत्येक, चाळीसगाव, चांदगड, दौंड, धारणगाव, गगनबावडा, जामनेर, कडेगाव, कर्जत, मुळदे, पाचोरा, पन्हाळा, पाथर्डी, पौड मुळशी, पुणे, राधानगरी, रावेर, शेवगाव, शिरोळ, शिरूर घोडनाडी, वडगाव मावळ 1 प्रत्येकी.

मराठवाडा : गेवराई, घनसावंगी, नांदेड 6 प्रत्येकी, अर्धापूर 5 जालना, लोहा, लोहारा प्रत्येकी 4, बीड, भूम, चाकूर, देवणी, गंगाखेड, परतूर, पूर्णा, रेणापूर, तुळजापूर, उमरगा, वसमत 3 प्रत्येकी, भोकरदन, जाफराबाद, कैज, कंधार, मंजल गाव, मुखेड, उस्मानाबाद, पालम, परभणी, पाथरी, सेलू, शिरूर कासार, सिल्लोड, सोनपेठ 2 प्रत्येकी, अंबड, औसा, बदनापूर, धर्मबाद, धारूर, जळकोट, कन्नड, मंठा, मानवत, मुदखेड, नायगाव खैरगाव, निलंगा, पैठण परळी वैजनाथ, पाटोदा, सोयेगाव, उमारी 2 प्रत्येकी.

विदर्भ : मालेगाव 8, सिंधखेड राजा,, बुलढाणा, नागपूर एपी, संग्रामपूर 5 प्रत्येकी, भामरागड, मेहकर 4, आर्मोरी, आष्टी, भरमपुरी, खामगाव, कुही, लोणार, मूल चेरा, नंदुरा, रिसोड, वाशिम 3, भद्रावती, चिखली, देऊळगाव राजा , मलकापूर, नागभिर, पातूर, रामटेक, शेगाव, वरोरा 2 प्रत्येकी, अकोला, आमगाव, आर्वी, बार्शी टाकळी, चांदूर, दारव्हा, देवळी, देवरी, देसाईगंज, घाटंजी, गोंदिया, गोंदिया एपी, गोरेगाव, हिंगणघाट, कळंब, कळमेश्वर, खारंगा, मंगळुरपीर, मोताळा, सावनेर, सेलू, वर्धा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 11, इुंगरवाडी 9, शिरगाव 6, खोपोली 5, अम्बोणे, कोयना(पोपळी) 2 प्रत्येकी, दावडी 1

पुढील हवामानाचा अंदाज:

21-22 सप्टेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

23 सप्टेंबर : कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

24 सप्टेंबर : कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

25 सप्टेंबर: कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

22 सप्टेंबर : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

23 सप्टेंबर : कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता . महाराष्ट्र -गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

24 सप्टेंबर : कोकण गोव्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.