Weather Report: महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

Weather Report: Extreme levels of rainfall were reported in the Ghats of Maharashtra कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मैघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या घाट विभागात येत्या 24 तासांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच, कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मैघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकण गोवा व विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये) 1 सेंमीपेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : चिपळूण 20, भिरा 18, दोडामार्ग 16, म्हापसा, फोंडा 15 प्रत्येकी, उल्हासनगर 14, मालवण, पेडणे, वैभववाडी 13 प्रत्येकी, माथेरान, म्हसळा, सावंतवाडी 12 प्रत्येकी, खेड, लांजा, मंडणगड, पंजिम (गोवा), पोलादपूर 12 प्रत्येकी, गुहागर, कुडाळ, मार्मगोवा, रत्नागिरी, संगमेश्वर देवरूख 10 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), राजापूर, सांगे, शहापूर, वेंगुर्ला, देवगड, जावर, कणकवली, माणगाव.

केपे, ठाणे, कर्जत, महाड, रोहा, सुधागड पाली 7 प्रत्येकी, खालापूर, पनवेल, तलासरी 6 प्रत्येकी, अंबरनाथ, बेलापूर (ठाणे), कल्याण, मडगाव, मोखेडा मुरुड, पालघर, पेन, रामेश्वरगरी 5 प्रत्येकी, भिवंडी, कानकोना, डहाणू, हर्णै, मुरबाड, उरण, विक्रमगड, वाडा 3 प्रत्येकी, मुंबई (कुलाबा) 2 प्रत्येकी, अत्रिबाग, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 21, गगनबावडा 14, चांदगड 13, लोणावळा (कृषी) 12, वेल्हे 11, राधानगरी 10, आजारा, पन्हाळा, पाटण 9 प्रत्येकी, इगतपुरी, शिराळा 8 प्रत्येकी, सुरगणा 7, भोर, पौड मुळशी, शाहुवाडी 6 प्रत्येकी, जावळी मेधा, कागल, कोरेगाव, पेठ, सातारा, त्र्यंबकेश्वर 5 प्रत्येकी, अक्कलकुवा, कराड, वाळवा इस्लामपूर 4 प्रत्येकी.

आंबेगाव घोडेगाव, बोदवड, धरणगाव, गारगोटी, हर्सून एफएमओ, हातकणंगले, कडेगाव, खंडाळा बावडा, कोल्हापूर, मिरज, मुळदे नवापूर, पारोळा, पुरंदर सासवड, साक्री, सांगली, शिरोळ, तळोदा, वडगाव मावळ, वाई 3 प्रत्येकी, अकोले, खटाव वडूज, खेड राजगुरूनगर, पुणे, शिरपूर, तासगाव, विटा 2 प्रत्येकी, भुसावळ, दहिवडी माण, धाडगाव, दिंडोरी, एरंडोल, इंदापूर, जामनेर, जुन्नर, कळवण, कर्जत, माढा, नांदगाव, ओझर (नाशिक), ओझरखेडा, पलूस, रावेर, शहादा, शेवगाव 1 प्रत्येकी.

मराठवाडा : औरंगाबाद, बदनापूर, बिलोली, धर्मबाद, कैज, उमारी 3 प्रत्येकी, अंबड, अर्धापूर, देगलूर, हिमायतनगर, कळंब, पैठण, सेलू, वाशी 2 प्रत्येकी, औंधा नागनाथ, बीड, भोकरदन, भूम, देवणी, गंगापूर, घनसावंगी, हदगाव, जाफराबाद, जळकोट, जिंतूर, कळमनुरी, मंजल गाव, मंथा, मुदखेड, नायगाव खैरगाव, नांदेड, उस्मानाबाद, परतूर, पाथरी, शिरूर कासार, सिल्लोड, सोयगाव, तुळजापूर, उमरगा, वसमत 1 प्रत्येकी.

विदर्भ : भामरागड 13, अहीरी, सिरोंचा 10 प्रत्येकी, एटापल्ली, मूल चेरा 5 प्रत्येकी, चामोर्शी, गोंड पिपरी 4 प्रत्येकी बल्लारपूर, धानोरा, गोंदिया, मोताळा, मुल, साओली, वणी 2 प्रत्येकी, अकोला, आमगाव, भद्रावती, चंद्रपूर, चिखली, चिमूर, धरणी, गडचिरोली, हिंगणघाट, कळंब, कोरची, कुरखेडा, नांदगाव काजी, नंदुरा, पोंभुर्णा, शिंदेवाही, सिंधखेड राजा, उमर खेड, वरोरा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना(पोफळी) 26, ताम्हिणी, दावडी 24 प्रत्येकी, शिरगाव 22, डोंगरवाडी 19, अम्बोणे 17, लोणावळा (ऑफिस) 12, लोणावळा (टाटा) 11, खोपोली 10, वळवण 9 कोयना (नवजा), वाणगाव 8 प्रत्येकी, शिरोटा 7, खंद, ठाकूरवाडी 6 प्रत्येकी, भिवपुरी 5

पुढील हवामानाचा अंदाज:

16-17 ऑगस्ट : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

18-19 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा :

17 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मैघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

18-19 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

20 ऑगस्ट : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात. तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.