Weather Report : मुंबईत जोरदार, पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

Heavy rains in Mumbai, light to moderate rains in Pune

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत कोंकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोंकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून जोरदार ते मुसळधार, तर पुण्यात मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्याच्या संपूर्ण भागात आज कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले. आज राज्याच्या सर्व भागातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. तर, पुण्यात आज 30.1 तर मुंबईत 29.5 अं.से. कमाल तापमान नोंदवण्यात आले.

मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुण्यात मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

येत्या दोन दिवसात कोंकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे.

# गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेमी मध्ये) ( 1 सेमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : पणजी (गोवा) – संगमेश्वर देवरुख 15 प्रत्येकी, कानाकोना, मडगाव, सांगे, वैभववाडी 14 प्रत्येकी, वाल्पोई 13, मारमागोवा, केपे, सावंतवाडी 12 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), दोडामार्ग कणकवली, पेडणे, वेंगुला 11 प्रत्येकी, देवगड, राजापूर 8 प्रत्येकी, कर्जत, मुळदे 7 प्रत्येकी, चिपळूण, मालवण 6 प्रत्येकी, गुहागर, हरनाई, कुडाळ, रामेश्वरी, रत्नागिरी 5 प्रत्येकी, लांजा, मुरुड, श्रीवर्धन 3 प्रत्येकी, दापोली, खेड, माथेरान, मुरबाड 2 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 16, राधानगरी 13, चंदगड 9, आजारा, कागल (7 प्रत्येकी), अकोले, गडहिंग्लज, कोल्हापूर, मंगळवेढा, पाचोरा, सांगोला (6 प्रत्येकी), आटपाडी, भडगाव, गारगोटी, पंढरपूर, पन्हाळा, शाहवडी, शिराळा, तळोदा (5 प्रत्येकी), शहादा, शिरपूर, विटा (4 प्रत्येकी), भुसावळ, चोपडा, धुळे, कवठे महाकाल, खटाव वडुज, माथा, महाबळेश्वर, शिरोळ, सिंदखेडा, तासगाव (3 प्रत्येकी), अक्कलकोट, आंबेगाव घोडेगाव, बारामती, दहिवडी माण, एरंडोल, हातकणंगले, खेड, जत, कराड, कोरेगाव, पलूस, राहाता, रावेर, शिरूर घोडनाडी, सिन्नर, सोलापूर, वडगाव मावळ, वाळवा इस्लामपूर (2 प्रत्येकी).

मराठवाडा : सोयेगाव 4, शिरूर कासार (3 प्रत्येकी), अंबड, आष्टी, बदनापूर, भूम, कन्नड, पैठण, परतूर (1 प्रत्येकी).

विदर्भ : शिंदेवाही 5, भामरागड, चिमूर, नागभिड, पर्सेनी 4 प्रत्येकी, अहीरी, बल्लारपूर, कामठी, मूल, राजुरा, साओल्ी, सिरोंचा (3 प्रत्येकी), चिखलदरा, एटापल्ली, गोंड पिपरी, पोंभुर्णा, वर्धा (2 प्रत्येकी), भद्रावती, चंद्रपूर, धानोरा, जिवती कळमेश्वर, मालेगाव, मौदा, नागपूर, रामटेक, सावनेर, सिंधखेड राजा, वरोरा (1 प्रत्येकी).

घाटमाथा : कोयना (नवजा) 10, कोयना (पोफळी) 5 , शिरोटा, धारावी, खंद ताम्हिणी (2 प्रत्येकी), लोणावळा (ऑफीस), शिरगाव, ठाकूरवाडी, अम्बोणे, भिवपुरी, दावडी, डुंगरवाडी, भिरा (1 प्रत्येकी).

# हवामान विभागाचा इशारा
आज (दि.17) कोंकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. गोवा – महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुरूवार (दि. 18 ) जून रोजी कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता तर गोवा व महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता सांगितली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.