Weather Report : पुण्यात मुसळधार तर मुंबईत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

मुंबई शहर व उपनगरात जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. : Heavy rains in Pune and sparse rains in Mumbai

एमपीसी न्यूज – पुण्यात येत्या 24 तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार तसेच मुंबई शहर व उपनगरात जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान :

कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

कोकण-गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : मुंबई (सांताक्रूझ) 27, पोलादपूर, रोहा 20 प्रत्येकी, भिरा, मंडणगड, म्हसळा, पेडणे, वसई 17 प्रत्येकी, माणगाव, रत्नागिरी, सांगे, सुधागड पाली 19 प्रत्येकी, दापोली, गुहागर, केपे, संगमेश्वर देवरुख, सावंतवाडी 14 प्रत्येकी, चिपळूण, दोडा मार्ग, ठाणे, उरण, वैभववाडी, वेंगुली 13 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), राजापूर, वल्पोई 12 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), कुडाळ, लांजा, रामेश्वरी 11 प्रत्येकी, खेड, महाड, श्रीवर्धन, उल्हासनगर 10 प्रत्येकी, अलिबाग, अंबरनाथ, कल्याण, कणकवली, माथेरान, मुरुड, कानकोन, देवगड, मालवण, म्हापसा, मार्मगोवा 8 प्रत्येकी, भिवंडी, हर्णे, खालापूर, पनवेल 7 प्रत्येकी, डहाणू, कर्जत, पेन 6 प्रत्येकी, पालघर 5, विक्रमगड, वडा, 3 प्रत्येकी, तलासरी 2, शहापूर 1.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 19, गगनबावडा 15, आजरा, चांदगड, राधानगरी 9 प्रत्येकी, लोणावाला (कृषी) 8, वेल्हे 7, पन्हाळा 5, भोर, पाटण, शाहूवाडी 4 प्रत्येकी, शिराळा, वडगाव मावळ, वाई 3, गडहिंग्लज, इगतपुरी, जावली मेधा, कागल, कोल्हापूर, मात्रेगाव, पोड मुळशी, पुणे (पाषाण), वाळवा इस्लामपूर 2 प्रत्येकी, कराड, पलूस, सातारा, सुरगणा, तासगाव, विटा 1 प्रत्येकी.

मराठवाडा : माहूर 2, भूम, जालना 1 प्रत्येकी.

विदर्भ : सडक अर्जुनी 7, आर्मोरी, ब्रम्हपुरी, देसाईगंज, साकोळी, तिरोरा 5 प्रत्येकी, अहीरी, भामरागड, गोरेगाव, लाखंदूर 4, आमगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, कुही, मौदा, वर्धा 3, आष्टी, भंडारा, धानोरा, सालेकसा, सावनेर, वरोरा 2 प्रत्येकी, आर्णी, बल्लारपूर, भद्रावती, भिवापूर, चिमूर, दिग्रस, एटापल्ली, गडचिरोली, घाटंजी, कोरची, कुरखेडा, लाखनी, मालेगाव, मोहाडी, नाग भीर, पौनी, सिरोंचा, तुमसर, उमरेड, वणी 1 प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 21, इुंगरवाडी 18, दावडी 16, शिरगाव, कोयना (पोफळी) 1 प्रत्येकी, खोपोळी 9, लोणावळा(ऑफिस), लोणावळा(टाटा), वळवण 8 प्रत्येकी, अम्बोणे 6, ठाकूरवाडी, शिरोटा, खंद 3 प्रत्येकी, वाणगाव, भिवपुरी, कोयना(नवजा) 2 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

04-05ऑगस्ट: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

06 ऑगस्ट: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

07 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

08 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा: 04 ऑगस्ट : कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता.

विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस,  तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.  मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.  महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

05 ऑगस्ट : कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता.मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

06 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

07 ऑगस्ट : दक्षिण कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.