Weather Report: कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुणे परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, हवामान खात्याचा अंदाज

एमपीसी न्यूज – कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी येत्या 24 तासांत अतिवृष्टी होण्याची तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

पुणे परिसरात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर मुंबई व उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे पुणे वेधशाळेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार व कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: मालवण 9, दोडामार्ग 7, गुहागर, संगमेश्वर देवरूख, वाडा 6 प्रत्येकी, कणकवली 5, सावंतवाडी 4, खेड, कुडाळ 3 प्रत्येकी, भिवंडी, चिपळूण, देवगड, माणगाव, पेडणे, रोहा, उल्हासनगर, वल्पोई 2 प्रत्येकी, अंबरनाथ , बेलापूर (ठाणे), कल्याण, कर्जत, खालापूर, लांजा, मंडणगड, म्हापसा, माथेरान, पोलादपूर, रत्नागिरी, शहापूर, सुधागड पात्री, वेंगुर्ला 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: सोलापूर 6, आजारा, अक्कलकोट 4 प्रत्येकी, चांदगड, मंगळवेढा, पंढरपूर, पाटण, वेल्हे 3 प्रत्येकी, बार्शी, भोर, मोहोळ 2 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, आटपाडी, गगनबावडा, जत, मिरज, पन्हाळा, पुरंदर सासवड, सांगली, सांगोला , शाहूवाडी, शिराळा, शिरोल 1 प्रत्येकी.

मराठवाडा: निलंगा 13, देवणी, उमरगा 8 प्रत्येकी, औसा, चाकूर 7 प्रत्येकी, शिरूर अनंतपाल 6 प्रत्येकी, लातूर, लोहारा 5 प्रत्येकी, जळकोट, तुळजापूर 4 प्रत्येकी, अहमदपूर, देगलूर, मुखेड, रेणापूर 3 प्रत्येकी, बिलोली, कैज, कंधार, लोहा 2 प्रत्येकी, अंबेजोगाई, अर्धापूर, भूम, धर्माबाद, धारूर, गंगाखेड, मुदखेड, पालम, पारंडा, उमरी, वाशी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

15 ऑक्टोबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.
16 ऑक्टोबर: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.
17 ऑक्टोबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.
18 ऑक्टोबर: कोंकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

इशारा:

15 ऑक्टोबर: कोकण गोंवा तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य- महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता . महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.
16 ऑक्टोबर: कोंकण – गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.