Weather Report : कोकण – गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता : Konkan - Goa Heavy rains likely in Goa, central Maharashtra

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रा च्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : मडगाव, सांगे 10 प्रत्येकी, दोडा मार्ग 8, केपे 7, लांजा 6, भिरा, माथेरान, पेण, फोंडा, सावंतवाडी, वैभववाडी 5 प्रत्येकी, जव्हार, कल्याण, कर्जत, खालापूर, कुडाळ, म्हापसा, पनवेल, पेडणे, उल्हासनगर 4 प्रत्येकी, अंबरनाथ, कानकोन, चिपळूण, म्हसाळा, पणजी (गोवा), पोलादपूर, राजापूर, रोहा, संगमेश्वर देवरुख, सुधागड-पाली, वाडा 3 प्रत्येकी, अलिबाग, डहाणू, कणकवली, खेड, मंडणगड, मार्मगोवा, पालघर, रत्नागिरी उरण, विक्रमगड 2 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), भिवंडी, देवगड, गुहागर, महाड, मालवण, मुंबई (संताक्रूझ), मुरबाड, मुरुड, शहापूर, श्रीवर्धन, तलासरी, वसई, वेंगुर्ला 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : चांदगड 9, गगनबावडा, राधानगरी 8 प्रत्येकी, वेल्हे 7, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर 6 प्रत्येकी, आजरा, इगतपुरी, पन्हाळा 5, पाटण, पेठ, शाहुवाडी, शिराळा 3 प्रत्येकी, भोर, गडहिंग्लज कागल, पौड मुळशी 2 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, कोल्हापूर, कोरेगाव, मुळदे, सातारा, त्र्यंबकेश्वर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : लोहा 4, धर्मबाद, कंधार 2 प्रत्येकी, भोकर, मुदखेड, नायगाव खैरगाव 1 प्रत्येकी.
विदर्भ : तुमसर 6, पारशिवनी, सडक-अर्जुनी, साकोली 5, भामरागड, भंडारा, लाखनी, मोहाडी, रामटेक 4 प्रत्येकी, देवरी, कोरची, मोंदा 2 प्रत्येकी, अहीरी, धरणी, कळमेश्वर, कुही, कुरखेडा, तिरोरा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : अम्बोणे 16, शिरगाव 12, कोयना(नवजा), ताम्हिणी 11 प्रत्येकी, दावडी 9, कोयना(पोफळी), लोणावळा(टाटा), डोंगरवाडी 6 प्रत्येकी, लोणावळा(ऑफिस), वळवण 5 प्रत्येकी, खंद 4, शिरोटा, ठाकूरवाडी, खोपोली 3 प्रत्येकी, वाणगाव, भिवपुरी 2 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

08-09 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शकक्‍्यता.

10 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

11-12 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

09 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रा च्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्‍यता.

10 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

11 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

12 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसाची शक्याता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.