Weather Report : पुणे साताऱ्यासह काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, परभणी, बीड, लातूर व हिंगोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांत विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. आज (रविवारी, दि.11) येत्या तीन-चार तासांत कोकण गोव्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

_MPC_DIR_MPU_II

आज संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.