Weather Report: कोकण-गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Weather Report: rare chances of rain in Konkan-Goa, Vidarbha पुणे आणि मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

एमपीसी न्यूज- कोकणसह राज्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासांत कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊसाची नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे आणि मुंबईकरांना सुद्धा पावसासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात पुणे आणि मुंबई मध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज 31.1 अं. सें तापमान नोंदवण्यात आले आहे.

* गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे (दि. 21, सकाळी 8.30 वाजेपर्यंत)

* कोकण आणि गोवा: कल्याण 3, लांजा 2, डोडा मार्ग, गुहागर, जव्हार, मडागाव, माथेरान, मोखेडा एफएमओ, पांझीम (गोवा), पेडणे, केपे, उल्हासनगर 1 प्रत्येकी.

* मध्य महाराष्ट: पन्हाळा 2, गगनबावडा, लोणावळा (आगरी), राधानगरी, रावेर 1 प्रत्येकी..

* मराठवाडा: मानवत 5, सेलू 4, चाकूर, मंथा नांदेड, सोनपेठ 3 प्रत्येकी, देवणी, कळमनुरी 2, गंगाखेड, हदगाव, जिंतूर, परतूर, पूर्णा 1 प्रत्येकी.

* विदर्भ: कोरची 3, चिखली, धानोरा, मंगलुरापीर, रिसोड, सिंधखेड राजा प्रत्येकी.

* घाटमाथा: कोयना (नवजा) 3, ताम्हिणी 2, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), शिरोटा, वळवण, अम्बोणे, कोयना (पोफळी) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. पुणे आणि मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.