Weather Report : कोकण – गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Warning of torrential rain in sparse places in Konkan -Goa, Marathwada : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

एमपीसी न्यूज – कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: गुहागर 11, देवगड 8, सांगे 7, कानकोन, दाभोलीम (गोवा), मडगाव, मार्मगोवा, मुंबई (कुलाबा), केप, सावंतवाडी 5 प्रत्येकी, पेडणे, रत्नागिरी 4 प्रत्येकी, चिपळूण, राजापूर, रामेश्वर कृषी, वसई 3 प्रत्येकी, दापोली, खेड, कुडाळ, मालवण, म्हापसा, माथेरान, म्हसळा, पोलादपूर, उरण, वैभववाडी, वेंगुर्ला 2 प्रत्येकी, डोडा मार्ग, हरनाई, कणकवली, खालापूर, लांजा, पालघर, पेण, संगमेश्वर देवरुख, शहापूर, वालपोई, विक्रमगड 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : सोलापूर 6, शेवगाव 4, दिंडोरी 3, कर्जत, राहुरी, सांगली, सतना बागलाण 2 प्रत्येकी, दहिवडी माण, देवला, गगनबावडा, हातकणंगले, कवठे महाकाळ, खटाव वडूज, कोरेगाव, माळशिरस, मुळदे, नंदुरबार, नवापूर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : चाकूर, फुलंब्री 3 प्रत्येकी, गंगापूर 2, खुलताबाद, लातूर, सिल्लोड 1 प्रत्येकी,

विदर्भ: दारव्हा, महागाव, वर्धा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : इुंगरवाडी, कोयना (पोफळी), ताम्हिणी 2 प्रत्येकी, शिरगाव, कोयना (नवजा), अम्बोणे, दावडी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

31 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

01 ऑगस्ट: कोंकण, गोवा बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

02 ऑगस्ट : कोंकण, गोवा बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

03 ऑगस्ट : कोंकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

04 ऑगस्ट : कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

31 जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

01 ऑगस्ट: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

02 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

03 ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

04 ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.