Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज – गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान

कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे . राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात

सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे 35.30 से. तर सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 14.6 से. नोंदवले गेले.

पुढील हवामानाचा अंदाज

30-31 ऑक्टोबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

01 नोव्हेंबर: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

02-03 नोव्हेंबर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा

30 ऑक्टोबर – 03 नोव्हेंबर: काही नाही.

पुण्यात व मुंबईतही आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.