_MPC_DIR_MPU_III

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Chance of torrential rain in sparse places in Central Maharashtra, Marathwada

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल राजस्थान, हरियाणा व पंजाबच्या उर्वरित भागात झाली आहे. नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा संपूर्ण देशात व्यापली आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोंकण गोवा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

 

गेल्या २४ तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) ( 1 सेंमी पेक्षा जास्त) खात्रीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : दोडामार्ग 2 , कर्जत, मुरबाड, शहापूर, ठाणे 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : माळशिरस 12 , अकोले, बारामती, कवठे महाकाळ 7 प्रत्येकी, कडेगाव, पुरंदर सासवड, सांगोला, सतना बागलाण 5 प्रत्येकी, आटपाडी, इंदापूर, जेऊर, राहाता, सोलापूर, विटा, वाई 4 प्रत्येकी, अमळनेर, दहिवडी माण, दौंड, खटाव वडूज, खेड राजगुरूनगर, मंगळवेढा, मिरज 3 प्रत्येकी, भडगाव, इगतपुरी, कागल, करमाळा, खंडाळा बावडा, मोहोळ, नेवासा, पारोळा, राहुरी, सातारा, श्रीरामपूर 2 प्रत्येकी, अक्कलकोट, भोर, चाळीसगाव, चोपडा, देवला, हातकणंगले, जामखेड, जाट, कर्जत , कोल्हापूर, कोपरगाव, कोरेगाव, महाबळेश्वर, पाचोरा, पारनेर, संगमनेर, सांगली, शिरोळ, श्रीगोंडा, सिन्नर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : आष्टी 8, देवणी 7, जळकोट 6 , अहमदपूर, गेओराई, हिमायतनगर, कळमनुरी, निलंगा 5 प्रत्येकी, औंधा नागनाथ, घनसावंगी, हिंगोली, कळंब, फुलंब्री, सेनगाव 4 प्रत्येकी, बीड, कन्नड, खुलताबाद, परंडा, सिल्लोड 3 प्रत्येकी, अंबेजोगाई, जिंतूर, कैज, रेणापूर, शिरूर कासार 2 प्रत्येकी, औसा, मनवत, परळी वैजनाथ, पूर्णा, सोनपेठ, वैजापूर, वडावणी 1 प्रत्येकी.

विदर्भ : देवळी, रिसोड 3 प्रत्येकी, अकोला, कारंजा लाड, काटोल, लोणार, मंगळुरपीर, वाशिम 2 प्रत्येकी, आर्णी, आष्टी, भिवापूर, दारव्हा, दिग्रस, जळगाव जामोद, कळंब, कळमेश्वर, मानोरा, नरखेडा, पौनी, पुसद 1 प्रत्येकी.

घाटमाथा : इंगरवाडी 13, भिरा 10, ताम्हिणी 9, खोपोली 3, लोणावळा (टाटा), दावडी 1 प्रत्येकी.

_MPC_DIR_MPU_II

* पुढील हवामानाचा अंदाज :

26 जून – कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

27 जून – कोंकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

28-29 जून – कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

* इशारा :

26-27 जून – कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

28 जून – कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

29-30 जून – कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.