Weather Update : पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार ; पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट 

एमपीसी न्यूज – मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यामध्ये काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आज आणि उद्या (बुधवार, गुरुवार) पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे.अलर्ट 

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या पाच जिह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, किनारपट्टीवरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने सुरु आहे. त्यामळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात पुढील 48 तासात धोधो पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल, तरच घराबाहेर पडावे. अन्यथा विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.