Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, काही जिल्ह्यात रेड अलर्ट

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून, काही जिल्ह्यात रेड अलर्ट तर, काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे.

लोणावळा आणि खंडाळा भाग पावासाने झोडपून काढला आहे. रविवारी दुपारपासून या भागात पावासाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत या भागात 175 मीमी पावासाची नोंद झाली आहे. तसेच, पवना धरण परिसरात 65 मीमी पावासाची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.