Weather Update News : राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस !

एमपीसी न्यूज : राज्यात एकीकडे कमालीची वाढणारी (Weather Update News) उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. या महिन्याच्या तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस (Weather Update News) होण्याची शक्यता आहे.

Pune News : पुण्यात सराईत गुंडांचा धुडगूस सुरू, सिंहगड रस्ता परिसरात दुकानदारांना मारहाण करून दहशत

 पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मे पर्यंत पावसाचा अंदाज आहे.

कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बागायदारांना मोठी नुकसान होऊ शकतं.

 अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.