Chakan : न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षण कायदा वैध ठरला असून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा हा घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. या निर्णयाचे चाकणमधील सकल मराठा समाजाने गुरुवारी (दि.२७) जोरदार स्वागत केले.

_MPC_DIR_MPU_II

एकमेकांना पेढे भरवून आणि फटक्यांची आतषबाजी करीत आणि ‘एक मराठा, लाख मराठा’, जय जिजाऊ.. जय शिवराय.. अशा घोषणा देत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. काही कार्यकर्ते झेंडे घेऊन आले होते. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक मनोहर वाडेकर, राहुल नायकवाडी, भगवान मेदनकर, अशोक मांडेकर, बाबाजी कौटकर, चाकणचे माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, व्यंकटेश सोरटे, निखील वाडेकर, साईनाथ घाटे, रोहिदास मांडेकर, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी मनोहर वाडेकर, भगवान मेदनकर, राहुल नायकवाडी यांनी न्यायालयाचे आणि शासनाचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1