Pimpri : …वेलकम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात 

एमपीसी न्यूज : विविध नृत्य, गाणी व कविताद्वारे मुलांनी आपल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कला सादर केल्या. चिमुकल्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या कलांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

_MPC_DIR_MPU_II

मारुंजी येथील वेलकम स्कूलच्या  वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आज (दि ९ ) उत्साहात पार पडला. चिमुकल्यांनी सादर केलेल्या वेगवेळ्या कलांनी वातावरणात जल्लोष निर्माण केला व उपस्थितांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. नृत्य, गाणी व कविता सादर करत जोश पूर्ण माहोलमध्ये चिमुरड्यानी उपस्थितांची मने जिंकली. तसेच शाळेच्या वतीने क्रीडा स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कला प्रदर्शन इ वेगवेगळ्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थांबरोबर, पालक आणि गावक-यांनी या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली होती.

वेलकम स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाला अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सिनेअभिनेते संदीप साकोरे, नारीशक्ती संघटनेच्या अध्यक्षा पूजा सराफ, मारुंजी गावाचे सरपंच/ उपसरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते. अभिनेते बाळकृष्ण नेहरकर यांच्या ‘जल्लोष’ या संगीतमय मैफिलीचे आयोजन या निम्मिताने करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सत्यभामा थोपटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.