Lonavala : मराठा आरक्षणाचे पेढे वाटून स्वागत 

एमपीसी न्यूज : मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा लोणावळ्यामध्ये पेढे वाटप करत जल्लोष करण्यात आला. लोणावळा शहरातील सकल मराठा समाजाने आज सकाळी मावळ पुतळा चौक ते शिवाजी महाराज चौक दरम्यान पायी प्रभात फेरी काढत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, यानंतर मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा जल्लोष करत शिवाजी चौकामध्ये पेढे वाटप करण्यात आले.

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणी करता काढलेल्या मोर्चा दरम्यान अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पोलीस बंदोबस्त लावत मोर्चा शांततेमध्ये पार पाडण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावलेले लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांना पेढे चारत सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.