Nigdi : निगडीत नृत्यसमन्वयचे बहारदार नृत्य सादर

एमपीसी न्यूज – कथक गुरु श्रीमती रोशन दाते यांच्या संशोधनावर आधारीत नृत्यसमन्वय हा नृत्याचा कार्यक्रम निगडी येथील डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या रंगमंचावर नुकताच सादर करण्यात आला. या नृत्यसमन्वय कार्यक्रमास कथ्थक, भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यातील शास्त्रीय तत्वांवर आधारीत उदबोधक अशा कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निगडीत झालेल्या या कार्यक्रमाला पं. नंदकिशोर कपोते यांचा गुरु रोशन दाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात नाट्यशास्त्रामधील अनेक विद्यांना एकूण १२ नृत्यरचनामधून गुरु रोशन दाते यांनी माहिती दिली. नृत्यसमन्वयात धनश्री नातू पोतदार, पवित्र भट, अजय शेंडगे, मयुरी हरिदास, शाश्वती पंढरपूरकर यांनी शिववंदना, ध्रृपद, वर्णम, रागमालिका पल्लवी, दशावतार, समधुनगीत, तिल्लाना, त्रिवट, नृत्तकरण, नृतहस्त चारी व शेवटी सुमधुर संगीताच्या साहाय्याने सादर केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी गुरु नंदकिशोर कपोतो यांच्या हस्ते कलाकारांना प्रशस्तीपत्रक देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.