Pune News : हडपसर वासीयांसाठी 200 बेडचे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार

एमपीसी न्यूज : हडपसर वासीयांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे यासाठी मगर हॉस्पिटलची जागा ताब्यात येणे आवश्यक होते. याठिकाणी पुणे शहर पोलीस युनिट 5 चे कार्यालय होते. त्यांच्याकडून ही जागा मनपाकडे हस्तांतरित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर ही जागा मनपाच्या ताब्यात आली आहे. या जागेत दोन टप्प्यात 200 बेडचे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे असे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले .

ते म्हणाले, ‘हडपसर येथील पुणे महापालिकेच्या कै. अण्णासाहेब मगर रुग्णालयाची आज आमदार चेतन तुपे पाटील यांच्या समवेत पाहणी केली.

वेगाने विकसित होत असलेल्या हडपसर परिसरात यापूर्वीच सुसज्ज असं मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणे गरजेचे होते. सध्या वैद्यकीय उपचारांसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे हडपसर परिसरात महापालिकेचे सर्व सुविधांनी सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आमदार तुपे यांच्यासह आमचे प्रयत्न सुरू होते.

त्यासाठी सर्वप्रथम मगर हॉस्पिटलची जागा ताब्यात येणे आवश्यक होते. याठिकाणी पुणे शहर पोलीस युनिट 5 चे कार्यालय होते. त्यांच्याकडून ही जागा मनपाकडे हस्तांतरित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर ही जागा मनपाच्या ताब्यात आली आहे. या जागेत दोन टप्प्यात 200 बेडचे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पहिल्या टप्प्यात एक इमारत बांधून त्यात सध्याचे रुग्णालय स्थलांतरीत करायचे, त्यानंतर उर्वरीत दुसऱ्या टप्प्यातील इमारत पूर्ण झाली की हडपसरच्या जनतेच्या सेवेसाठी मनपाचे चांगले रुग्णालय उपलब्ध होईल. तोपर्यंत सध्याच्या इमारतीमध्ये स्वच्छता व डागडुजी करून लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तसेच हडपसर भागातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या मदतीने ओपीडीही सुरू करण्यात येणार आहे. असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

या पाहणी दौऱ्यात हडपसर विधानसभा मतदारसंघातील लसीकरण कार्यक्रमांचा देखील आढावा घेतला. यावेळी माजी उपमहापौर निलेश मगर, नगरसेवक योगेशबापू ससाणे, नगरसेविका वैशालीताई बनकर, नगरसेविका पूजाताई कोद्रे, हडपसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. अमोल हरपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. गुरुदास चुडाप्पा आदी उपस्थित होते.

खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी वाडेबोल्हाई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच लसीकरण नियोजनाची आणि लस उपलब्धतेची माहिती घेतली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वृक्षारोपणही केले. याप्रसंगी दिलीप वाल्हेकर, सरपंच दीपक कुशाबा गावडे, माजी उपसरपंच राजेश भाऊ वरघडे, शिरसवडी गावचे सरपंच संतोष गावडे, माजी उपसरपंच सुरेखाताई भोरडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव भोरडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सचिन सूर्यवंशी, डाॅ. करुणा जगताप साळवे मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेबोलाई येथील सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आज खा. कोल्हे यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामपंचायत सदस्य व अधिकाऱ्यांसमवेत लसीकरणाची सद्यस्थिती व कोविड उपाययोजनांचा आढावा घेतला.याभेटी संद्रभात ते म्हणाले ,’ उरुळी कांचन हे मोठे व बाजारपेठेचे गाव असून इथे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. मात्र ५ एकर जागेच्या निकषामुळे असल्याने अडचणी येत आहेत.

त्यामुळे पेरी अर्बन विभागाचे निकष लावून ३ एकर जागेत ग्रामीण रुग्णालय उभारण्याची मागणी सरपंच संतोष कांचन यांनी केली. तसेच पुरेशा प्रमाणात वॅक्सिन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या संदर्भात आपण नक्कीच लक्ष घालणार असून त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न करणार आहोत. यानंतर उरळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, डॉ. सुचिता कदम, उपस‌रपंच संचिता कांचन, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जि. प. सदस्या कीर्ती कांचन, पं.स. सदस्या हेमलता बढेकर, अमित कांचन, सागर आबा कांचन व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.