Talegaon : सुप्रसिद्ध सिनेनाट्य आणि मालिका कलाकार सुबोध भावे तळेगावला येणार

एमपीसी न्यूज : सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी मोहोर उमटविणाऱ्या कलापिनी संस्थेचा ४६ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. ३ जुन २०२३ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता कलापिनीच्या कै.डॉ.शं.वा.परांजपे नाट्य संकुलात (Talegaon) होणार आहे.

Alandi : आळंदी मधील ऐतिहासिक भागीरथी कुंडच दिसेनासे !

तळेगावकर (Talegaon) रसिक गेली ४६ वर्षे कलापिनीच्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहेत. स्थानिक कलाकारांना उत्तम असे व्यासपीठ देणे हे कलापिनीचे मुख्य ध्येय आहे. कलेद्वारे विकास हे ब्रीद बाळगून सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत आयोजित केली आहे.

वर्धापन दिनानिमित्त कलापिनीच्या विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे, हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे तरी सर्व रसिकांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण अध्यक्ष विनायक अभ्यंकर व कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी मावळच्या रसिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.