सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालय उदघाटन सोहळा सोमवारी

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि साहित्यिक कट्टा वारजेतर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालय उदघाटन सोहळा सुप्रसिद्ध बाल साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते आयोजित केला आहे. यावेळी बर्वे यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये शब्दब्रह्म व्याख्यानमाला होणार आहे. सोमवार (दि. 28 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 5 वा. गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्र ईशान नगरी केंद्र शेजारी वारजे येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पुणे शिक्षण मंडळांचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी दिली. साहित्यिक कट्टा वारजे सचिव डी. के. जोशी, सदस्य उदय कुलकर्णी, नंदकिशोर बोधाई, अरुण पाटील उपस्थित होते.

PCMC: भामा-आसखेड जॅकवेल कामाची निविदा रद्द करा, नव्याने निविदा प्रक्रिया राबवा – अजित गव्हाणे

सोमवारी (दि. 28 नोव्हेंबर) सायंकाळी 6 वा. महाराष्ट्राची लोककला विषयावर डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचे, अध्यक्षस्थानी शानु पटेल हायस्कूलचे प्रा. मल्लिकार्जुन नावंदे, मंगळवारी (दि. 29 नोव्हेंबर) सायंकाळी 6 वा. लोकशिक्षक संत गाडगेबाबा विषयावर जेष्ठ साहित्यिक वि. दा. पिंगळे यांचे, अध्यक्षस्थानी सहयाद्री नॅशनल स्कुलचे विजय बराटे, बुधवारी ( दि. 30 नोव्हेंबर) सायंकाळी 6 वा. गांधी आडवा येतो या विषयावर जेष्ठ संपादक संजय आवटे यांचे, अध्यक्षस्थानी स्मिता पाटील हायस्कूलचे प्रा. एस. आर. पाटील, गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) सायंकाळी 6 वा. भारतीय समाजाची सद्यस्थिती या विषयावर डॉ. प्राचार्य सुधाकर जाधवर यांचे मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी आर. एम. डी. कॉलेजचे प्राचार्य वैभव दीक्षित असतील. यामध्ये स्थानिक लेखकांचे पुस्तक व विक्री उपलब्ध असेल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य, ज्योत्स्ना चांदगुडे, वि. दा. पिंगळे, गोपाळ कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, महेश कुलकर्णी, शरद जतकर, साधना कुलकर्णी, निवृत्ती येनपुरे, जयंत मोहिते, सुरेश जाधव, अशोक शहा, मानसी नलावडे, महादेव गायकवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.