West Bengal Election Results 2021 LIVE : ममता दीदी तब्बल 14 हजार मतांनी पिछाडीवर

एमपीसी न्यूज : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत. ममता दीदी तब्बल 14 हजार मतांनी पिछाडीवर असून तृणमूल ची चिंता वाढली आहे.

_MPC_DIR_MPU_II

यंदाच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार टक्कर दिली आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आघाडीवर असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. दरम्यान ममता बॅनर्जी जरी पिछाडीवर असल्या तरी तृणमूल काँग्रेस मात्र भाजपच्या पुढे जाऊन तृणमूल काँग्रेसची एकहाती सत्ता येऊ शकते….सध्या तृणमूल काँग्रेस तब्बल 137 जागांवर आघाडीवर असून बहुमतासाठी फक्त 10 जागांची गरज आहे

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात 44 दिवस व्हीलचेअरवर प्रचार करत होत्या. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे 20 जाहीर सभा घेतल्या आणि अमित शहा यांनी सुमारे 70 रॅली काढल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.