Shivsena : पुण्यातील शिवसैनिक संतप्त, बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोबत हे काय केलं? 

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या काही आमदारांनी स्वतःच्याच पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांच्याविरोधात राज्यभरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी त्यांच्या घरावर तर कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली आहे. पुण्यातही आज हडपसर परिसरात बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी  (Shivsena) बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. 

शिवसेनेच्या (Shivsena) हडपसर मतदार संघाच्यावतीने आज सकाळी हे आंदोलन करण्यात आले. हडपसर परिसरातील गाडीतळ ते माळवाडी अशी या बंडखोर आमदारांची प्रतिकत्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर हडपसर परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
गाडीतळ परिसरात एकत्र जमलेल्या शिवसैनिकांनी बंडखोर आमदार विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. त्यानंतर सात रुग्ण वाहिनीच्या माध्यमातून गाडीतळ ते माळवाडी येथील अमरधाम स्मशानभूमीपर्यंत  त्यांची  प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. नंतर स्मशानभूमीत प्रतिकात्मक तिरडीवरून तिचा अंत्यविधी करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.