Raj Thackeray : महाराष्ट्रात जे काही चाललंय ती चांगली गोष्ट नाही – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – सध्याच्या अस्थिर परीस्थितीकडं एक संधी म्हणून बघा असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकारी यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. शस्त्रक्रीयेनंतर प्रथमच त्यांनी मंगळवारी मुंबईत पदाधिकारी यांची बैठक घेतली. केवळ महापालिका नव्हे तर मनसे आता स्थानिक पातळीपासून ते लोकसभेपर्यंतच्या तयारीला लागली असल्याचे आजच्या सभेच्यानिमित्ताने दिसले.

या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, माझ्या शस्त्रक्रीयेला आता दोन महिने पुर्ण झाले आहेत. कोरोनामुळे माझ्या हाडांचा आजार बळावलाय, असं त्यांनी मेळाव्यात स्पष्ट केले. मुंबईत मनसे पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी त्यांनी शस्त्रक्रीयेबाबत संपूर्ण माहीती दिली.

राज ठाकरे म्हणाले की, मी उद्या पुण्याला जाणार आहे. त्याशिवाय नाशिकलासुध्दा जाणार आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही बैठकीचे आयोजन करु नका, असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांना देखील टोमणा मारला. आज आपल्या पक्षाबाबत काही राजकीय पक्षांकडून अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे आपण सतर्क रहायला हवे. मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा चुकीचा आरोप आहे. आम्ही राज्यात 65 ते  67 टोलनाके बंद केले. मात्र शिवसेना सत्तेत असताना त्यांनी काय केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र असा उल्लेख केला होता त्याचं काय झाले. टोलचा पैसा जातो कुठे हा आपला मुळ प्रश्न आहे. टोलबाबत कोणतीही उत्तर सरकारकडून मिळाली नाहीत. सत्ता हातात द्या, सगळे टोल बंद करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज म्हणाले की, पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 92-93 भोंगे बंद झाले. बाकीच्या प्रार्थनाही आता कमी आवाजात होतात. या भोंग्यांबाबत ते पत्र होते. मी हे पत्र फेसबुक, व्टिटर, व्हॅटस्अपवर टाकू शकलो असतो. पत्रकार परिषद घेऊनही ते वाचून दाखवू शकलो असतो.पण मी हे पत्र तुमच्या हातात का दिले तर मला पहायचं होते तुमचा आणि समाजाचा किती संपर्क आहे. तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचता, लोकांकडे जाताय की नाही जाताय. याबाबत काहींनी मोठ्याप्रमाणात हलगर्जीपणा केला. सगळे थंड झालेत.निवडणुकांचे वारे फक्त डोक्यात आहेत. दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात जे काही चालले आहे ती काही चांगली गोष्ट नाही. याआधी असं कधी नव्हतं.कोण कोणामध्ये मिसळालाय आणि कोण कोणासोबत गेला काहीच कळतं नाहीये, अशी प्रतिक्रीया राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.