Maval : मावळच्या उमेदवारांची किती आहे संपत्ती?

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीकडून निवडणूक लढविणारे सुनील शेळके यांच्याकडे 28 कोटी, अपक्ष निवडणूक लढविणारे रवींद्र भेगडे यांच्याकडे 11 कोटी आणि महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांच्याकडे सात कोटीची संपत्ती आहे. या तीनही उमेदवारांनी पत्नीच्या संपत्तीचा तपशील स्वतंत्र दाखविला आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांची  25 कोटी 24 लाख जंगम तर 3 कोटी 35 लाख स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर 5 कोटी 13 लाखाचे कर्ज आहे. जनता सहकारी बँक, पीडीसीसी बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँकेत त्यांच्या ठेवी असून  विश्वनाथ भेगडे नागरी सहकारी संस्था, तळेगाव नागरी सहकारी पतसंस्था, डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था अशा 11 ठिकाणी शेअर्स आहेत. एलआयसीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी  सात कोटी 34 लाखाचे कर्ज दिले आहे.

जॉगवाॅर, ऑडी, व्हॉक्सव्हॅगन, इनोव्हा, टँकर, टेम्पो, क्रेन, दहा दुचाकी अशी त्यांच्याकडे वाहने आहेत. 23 लाखाचे सोने आहे. तळेगावदाभाडे, वडगाव,  वराळेमध्ये बिगर शेतजमीन आहे. तळेगाव दाभाडे येथे निवासी इमारत आहे. शेती आणि व्यवसाय हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे.

रवींद्र भेगडे यांच्याकडे 11 कोटी 14 लाख

अपक्ष निवडणूक लढविणारे रवींद्र भेगडे यांच्याकडे 9 कोटी 40 लाख स्थावर तर 1 कोटी 74 लाख जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर 7 कोटी 38 लाखाचे कर्ज आहे.  बँक ऑफ महाराष्ट्र, पीडीसीसी बँक, जनता सहकारी बँकेत त्यांच्या ठेवी आहेत. आर्या मॉडर्न इन्फ्राप्रोजेक्टमध्ये त्यांचे शेअर्स आहेत. एलआयसी मध्ये गुंतवणूक केली आहे. एका चारचाकी असून दोन लाख 22 हजाराचे सोने आहे.

धामणे, इंगळूण, करंजविहीरे ठिकाणी, इंदुरी येथे शेतजमीन आहे.  करंजविहीरे, सुदवडी येथे बिगर शेत जमीन आहे.  तळेगावदाभाडे येथे व्यावसायिक इमारत आहे. चालू बाजार भावानुसार  24 लाख त्याची किमंत आहे. निवासी इमारतीची  66 लाख 37 हजार रुपये किंमत आहे.  त्यांचे बी-कॉमपर्यंतचे शिक्षण झाले आहे.

बाळा भेगडे  सात कोटी 53 लाखाचे धनी
महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे बाळा भेगडे यांच्याकडे सहा कोटी 89 लाख स्थावर  तर 67 लाख  जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर  तीन कोटी 18 लाखाचे कर्ज आहे.  भारतीय स्टेट बँक, युनियन बँक, पीडीसीसी बँक, रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेसह 11 बँकांमध्ये त्यांच्या ठेवी आहेत.

विश्वनाथ भेगडे नागरी पतसंस्था, तळेगाव  नागरी पतसंस्था, पुणे पिपल्स को-ऑ.बँक, रुपी को-ऑ.बँक अशा 25 ठिकाणी त्यांचे शेअर्स आहेत. एलआयसीमध्ये गुंतवणूक केली आहे. दोन चारचाकी वाहने 25 लाख 35 हजार रुपयांची आहेत. 36 हजार रुपयांची सोने-चांदी आहेत. तळेगावदाभाडे येथे पाच ठिकाणी तर उर्सेत तीन ठिकाणी शेतजमीन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.