Pimpri news: ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय करावे? डॉ. अमोल कोल्हे सांगतात…

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडतात. होम आयसोलेशनमध्ये असताना कधी कधी रुग्णाची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाते. त्यावेळी काय नेमके करावे याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सल्ला दिला आहे.  ‘कार्प प्रोटोकॉल’ करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

खासदार डॉ. कोल्हे सांगतात, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या रुग्णांमध्ये 94 ते 95 एवढी ऑक्सिजनची पातळी सामान्य समजली जाते. पण, रुग्णांची ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा खाली येत असेल. तर, काय करावे. अर्थात तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. वैद्यकीय मदत मागविली पाहिजे. पण, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत. ‘कार्प प्रोटोकॉल’ ज्याला कोविड अवेगनिंग, रिपोजसनिंग आणि प्रोनींग असे म्हणतो. त्या ‘कार्प प्रोटोकॉल’चा वापर करून आपण रुग्णांची ऑक्सिजनची पातळी नक्कीच सामान्य ठेवू शकतो.

काय आहे ‘कार्प प्रोटोकॉल’?

यामध्ये रुग्णाला पालथे झोपवावे. मानेखाली एक उशी द्यावी. पोट ते मांडी इथपर्यंत एक ते दोन उशा ठेवाव्यात आणि पायाच्या नडगीखाली दोन उशा ठेवाव्यात. या पोजिशेनमध्ये रुग्णाला पालथे झोपवावे. रुग्णाला लागलेली थाप कमी होते का, ते पहावे. ऑक्सिजनची पातळी पुन्हा एकदा तपासून पाहावी. (परंतु, गरोदर महिला रुग्ण असेल, ह्रदयाचा, मणक्याचा काही आजार असेल.

तर, पालथे झोपण्याची पोजिशेन शक्यतो टाळावी.) त्यानंतर रुग्णाला उजवा हात डोक्याखाली घेऊन उजव्या कुशीवर निस्त करावे. पुन्हा एकदा ऑक्सिजन पातळी तपासून पहावी. त्यानंतर रुग्णाला 70  अंशाच्या कोनात बसते करावे. त्यानंतर डावा हात डोक्याखाली घेऊन डाव्या कुशीवर निस्त करावे. पुन्हा रुग्णाला पालथे पोटावर झोपवावे आणि पुन्हा एकदा ऑक्सिजनची पातळी तपासून बघावी. या ‘कार्प प्रोटोकॉल’चा जर आपण योग्य वापर केला.

तर, साधारण एक ते दोन लीटर पर मिनीटची ऑक्सिजनची मागणी नक्कीच भागवता येऊ शकते. त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नये. योग्यवेळी उपचार मिळाले. तर, 97 ते 98 टक्के कोरोनाचे रुग्ण ठणठणीत बरे होतात, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.