WhatsApp Privacy Policy : तर तुमचे व्हॉट्सॲप कॉलिंग झाले असेल बंद

एमपीसी न्यूज :  व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीवरुन अनेक संभ्रम निर्माण झाले होते. व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास  व्हॉट्सॲप वापरता येणार नाही असे व्हॉट्सॲप कडून सांगण्यात आले होते. नवीन व्हॉट्सॲप पॉलिसी ॲक्सेप्ट करण्यासाठी  व्हॉट्सॲपने आता रिमाइंडर द्यायला सुरुवात केली आहे.

व्हॉट्सॲपने 15 मे पर्यंत व्हॉट्सॲप पॉलिसी स्वीकारण्यासाठी सांगितले होते. मात्र ज्यांनी ही पॉलिसी अक्सेप्ट केलेली नाही अशा अनेक युझर्सचे व्हॉट्सॲप कॉलिंग (WhatsApp calling) बंद होत आहेत. बरेच  व्हॉट्सॲप युझर्स व्हॉट्सॲप कॉलिंग करु शकत नाहीत किंवा त्यांना कॉलिंग करताना अडथळे येत आहेत.

त्याचप्रमाणे काहींना व्हिडिओ कॉलिंग करतानाही अडथळे येत आहेत. व्हॉट्सॲप कडून हळू हळू ऑडिओ आणि व्हिडिओ सेवा कमी करण्यात येत आहे. त्यामुळे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा परत मिळवण्यासाठी What’s App Privacy Policy अक्सेप्ट करावी लागणार आहे.

ज्या युझर्सनी Privacy Policy अक्सेप्ट केलेली नाही त्यांना  व्हॉट्सॲप कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगमध्ये अडथळा येत आहे तर काहींना यात कोणताही अडथळा येत नाही. मात्र व्हॉट्सॲप युझर्ससाठी एक पॉप येत आहे. ज्यात व्हॉट्सॲप Privacy Policy अक्सेप्ट करण्याची आठवण करुन देत आहे.

गेल्या आठवड्यात IT मंत्रालयाने व्हॉट्सॲप privacy Policy मागे घेण्यास सांगितले होते. व्हॉट्सॲप कडून जर याबाबतीत योग्य उत्तम मिळाले नाही तर या विरोधात कारवाई केली जाईल असेही सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु  व्हॉट्सॲप कडून याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. सरकारने व्हॉट्सॲपला 7 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे पुढील काळात व्हॉट्सॲप काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.