Pune : जेव्हा चंद्रकांत पाटील अजित पवारांची वाट पाहतात!

एमपीसी न्यूज – राजकारणात कधी काय होणार ते सांगता येत नाही. कालपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोमवारी दुपारी 4 वा. पासून उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून आले.

सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हीएशन गॅलरीचा उद्घाटन सोहळ्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, राज्यसभेच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण उपस्थित होत्या. अजित पवार यांना कार्यक्रमस्थळी येण्यास उशीर लागत असल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीमध्ये चर्चेचे फड रंगले होते. एरवी कार्यक्रमांना वेळेवर हजेरी लावणारे अजित पवार आज मात्र उशिरा आल्याने खमंग चर्चांना उत आला होता.

_MPC_DIR_MPU_II

…अखेर पावणेपाचच्या दरम्यान अजित पवार कार्यक्रम स्थळी पोहोचले.

अखेर अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.