chacha chicago : …जेव्हा कडक उन्हात बसलेल्या पाकिस्तानी फॅनला धोनी सुरेश रैनाच्या हस्ते गॅागल पाठवतो 

When Dhoni sends a goggle to a Pakistani fan sitting in the scorching sun by the hands of Suresh Raina.

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याने 15 आॅगस्ट रोजी आंतरराष्टीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या जगभरातील फॅन्सला आश्चर्याचा धक्का दिला. असाच एक पाकिस्तानी धोनीचा जबर फॅन असून त्याने सुद्धा धोनी सोबत निवृत्ती जाहीर केली आहे. 

पाकिस्तान मधील कराची येथे जन्मलेले मोहम्मद बशीर बोजाई हे कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचे जबरा फॅन आहेत. त्यांचे वय 65 वर्ष असून  त्यांना ‘चाचा शिकागो’ या नावाने देखील ओळखले जाते.

चाचा शिकागो हे शिकागो येथे एक रेस्टॉरंट चालवतात आणि त्यांच्या पत्नी भारतातील हैद्राबाद येथील आहेत. चाचा शिकागो आणि धोनी यांच्यातील संबंध 2011 नंतर द्रुढ झाले ते एवढे दृढ झाले की मागील आठ वर्षांपासून धोनी चाचा शिकागो यांना त्याच्या प्रत्येक मॅचचे तिकीट स्वतः पाठवत होता.

धोनीने अचानक निवृत्ती जाहीर केली आणि चाचा शिकागो यांनी आपल्याला जास्त दुःख झाल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. ते म्हणाले धोनीने निवृत्ती जाहीर केली आता मी सुद्धा निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. यापुढे भारत पाकिस्तानचा सामना मी पाहणार नाही. आता यांच्यातील सामने पाहण्यात काही अर्थ नाही असे ते म्हणाले. प्रत्येक खेळाडूला एक दिवस निवृत्ती घ्यावी लागते पण धोनीने निवृत्ती घेऊन मला दुःखी केलं असल्याचं चाचा म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

धोनीला समर्थन दिल्यामुळे आणि चीअर केल्यामुळे मला पाकिस्तानी लोकांनी गद्दार म्हणून हिनवले तसेच अभद्र शब्दात माझी बदनामी केली. पण मी धोनी वर प्रेम करतो आणि तेवढेच प्रेम तो ही माझ्यावर करतो असे चाचा शिकागो म्हणाले.

धोनीच्या अविस्मरणीय आठवणीबद्दल सांगताना चाचा शिकागो यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, 2015 च्या विश्वचषक दरम्यान सिडनी येथे सुरु असलेला सामना मी कडक उन्हात बसून पाहत होतो.

त्यावेळी त्याठिकाणी सुरेश रैना माझ्याजवळ आला आणि त्याने मला गॉगल दिला आणि म्हणाला हा धोनी भाईने दिला आहे. मी रैनाकडे पाहत राहलो आणि हसलो. माझ्या आयुष्यातला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही असे ते म्हणाले.

मोहम्मद बशीर बोजाई यांना तीन वेळा हृदय विकाराचा झटका येऊन गेला आहे त्यामुळे, आता प्रवास करणे शक्य होत नसल्याचे ते म्हणाले. मला तिथं जाऊन आयपीएल पाहण्याची खूप इच्छा आहे पण कोरोनामुळे ते शक्य नाही. मात्र मोहम्मद बशीर बोजाई यांची धोनीला भेटण्यासाठी रांचीला येण्याची इच्छा आहे.

मोहम्मद बशीर सांगतात एकदा बर्मिंघम मध्ये पाकिस्तानी प्रेक्षकांनी माझ्यावर फार खालच्या पातळीवर जाऊन टीका केली मला गद्दार म्हटले पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. प्रेम तर माझे दोन्ही देशावर आहे आणि तसे पाहिलं तर बाकी सगळ्यापेक्षा मानवता सर्वप्रथम असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.