Maharashtra News: तिघेजण एकत्र येऊन संघर्ष करत असतात तेव्हा एकट्याने फाईट देण्याचा प्रयत्न करायचा असतो-चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज: भारतीय जनता पक्षाला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तिघेजण एकत्र येऊन एकट्याशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळे चित्र होऊ शकणार नाही. तरीही आम्ही निकराची लढाई दिली आहे. माझं त्यांना नेहमीसारखे आव्हान आहेच. हिम्मत असेल तर एकटं एकटं लढा. तिघेजण एकत्र येऊन जेव्हा संघर्ष करत असतात तेव्हा एकट्याने फाईट देण्याचा प्रयत्न करायचा असतो. प्रत्येक वेळी विजय होईलच असे नाही

_MPC_DIR_MPU_II

चंद्रकांत पाटील म्हणाले, या निकालानंतर शिवसेनेने विचार करण्याची गरज आहे. विधानपरिषदेच्या या निकालानंतर त्यांना काय मिळाले? अमरावतीतील जागा ही त्यांची हरली. इतर ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांची संघटना वाढवत आहेत आणि शिवसेनेचे खच्चीकरण करत आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महा विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. तर नागपूरमध्येही भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. पुणे मतदार संघात तर भाजपला तब्बल वीस वर्षांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वर्षानुवर्षे भाजपला साथ देणाऱ्या पुणे आणि नागपूर येथील मतदारांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडत महाविकास आघाडीच्या पारड्यात आपले निर्णायक मत टाकले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.