Pune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर शिवसेनेच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी

एमपीसी न्यूज – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर मंगळवारी पुणे महापालिका शिवसेनेच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी वाढली. महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य पुणेकरांसोबतच अधिकाऱ्यांनीही गर्दी केली होती.

काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाशिव आघाडीतर्फे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याने पुण्यातील कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’ मिळणार असल्याची चर्चा आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजप – शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे काँगेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैराभैरा झाले होते. आता महाशिव आघाडी स्थापन करण्यात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मोठा वाटा आहे.

या महाशिव आघाडीमुळे पुण्यातील राजकारणातही पडसाद उमटणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजपची युती होती. भाजपने आठही जागा पुण्यात लढविल्या. शिवसेनेला एकही जागा सोडण्यात आली नव्हती. त्यामुळे शिवसैनिक दुखावले होते. आता सत्तेमुळे संघटनेत जान येणार असल्याची कुजबुज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.