विकृत प्रवृत्तीचे लोक कधी सुधारतील?-वर्षा जगताप

वर्ध्यातील हिंगणघाटात शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे घटनेमुळे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. औरंगाबाद येथे जळतीकांडात महिलेचा मृत्यू झाला आहे. या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमुळे समाजातील अशा विकृत प्रवृत्तीचे लोक कधी सुधारतील? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा वर्षा जगताप यांनी केला आहे. समाजव्यवस्था यांचा गांभीर्याने विचार करून या घटनांना पायबंद करण्यासाठी काय पावले उचलतील हाच मोठा प्रश्न.

राज्यात गेल्या चार दिवसांत महिलांवर झालेल्या हल्ल्यांच्या समाजातील विविध स्तरांतून निषेध होत आहे. शाळकरी, मुले-मुली, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संघटना विविध राजकीय पक्षांनी निषेध केलेला आहे. परंतु, केवळ निषेध करुन आंदोलने करून हा प्रश्न सुटणार आहे का? पिडितेला न्याय मिळेल का ? आपली समाज व्यवस्था बदलेल का? युवती, महिला मधील असलेली असुरक्षितता भिती जाईल का ? अश्या असंख्य प्रश्नांचा भडिमार माझ्या सारख्या एका शिक्षिकेला होत आहे.

काही वर्षांपुर्वी दहावीतल्या रिंकू पाटीलच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. या संपूर्ण घटनेचा विचार केला. तर तो म्हणजे एकतर्फी प्रेमातून नैराश्य येऊन केलेले हे विधारक कृत्य होय, हे बंद झाले पाहिजे. प्रेम म्हणजे काय..! हे अशा विकृत मानसिकतेला कधीच नाही कळनार… आपल्या भारत देशात स्त्रीला सर्वोच्च स्थान आहे. स्त्रीला देखील मन, भावना आहे. तीच्या भावनांचा विचार समोरच्यांना केला पाहिजे. केवळ एक तर्फी प्रेमातून मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न करू नये. प्रेम स्वीकारायचे किंवा नाकारायचे हे स्वातंत्र्य स्त्रीला आहे. ते भविष्यात देखील अबाधितच राहिले पाहिजे.

अशा घटनांमुळे पुरोगामी महाराष्ट्र नक्की कोणात्या दिशेने वाटचाल करीत आहे. विकृत प्रवृत्तीच्या लोकांचा जागीच एन्काउंन्टर केले पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांनी देखील हैद्राबाद पोलिसांचा आदर्श घ्यावा अशी मानसिकता सर्व सामान्यांची झालेली आहे.

– वर्षा जगताप,
शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.