Pimpri News : शहरातील 5 वी ते 8 वीच्या शाळा कधी सुरू होणार, आयुक्त म्हणतात…

एमपीसी न्यूज – नववी ते बारावीचे वर्ग सुरुळीत झाल्यानंतर राज्य शासनाने  इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्यापर्यंत शाळांबाबतचा निर्णय घेतलेला नाही. शहराचा आढावा घेवून शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसात घेतला जाईल असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूीवर स्थानिक स्थिती लक्षात घेवून निर्णय घेण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेणे आवश्यक आहे. एका बाकावर एकाच विद्यार्थ्यांला बसवावे लागणार आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला पालकांचे संमतीपत्र आवश्यक असणार आहे. पालक संमतीपत्र देतात  की नाही यावरच शाळा सुरू होणार की नाही, हे ठरणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

इयत्ता 9 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होवून जवळपास एक आठवडा झाला आहे.  विद्यार्थी शाळेत येण्याऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण हे आता 50  टक्क्यांपर्यंत गेले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पाचवी ते आठवीच्या महापालिका आणि खासगी मि‌‌ळून एकूण 659  शाळा आहेत. यामध्ये 1 लाख 32 हजार 438  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी आणि महापालिकेचे मि‌ळून जवळपास तीन हजार शिक्षक आहेत.

शाळांबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय – आयुक्त  

पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून सूचना आलेल्या आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय दोन-तीन दिवसांत घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.