Temghar Dam : टेमघर धरणाच्या पाणी गळतीचा प्रश्न सुटणार केव्हा???

एमपीसी न्यूज : पुण्यातील टेमघर धरणाच्या पाणी (Temghar Dam) गळतीचा प्रश्न सुटत नसल्याचे समोर आले आहे. मुठा नदीवर मुळशी तालुक्यातील मौजे लव्हार्डे येथे असलेले हे धरण. या धरणाचा पाणी गळतीचा प्रश्न 500 कोटी खर्च करूनही सुटलेला नाही. या उलट अजून 200 कोटींची मागणी जलसंपदा विभागाने राज्य सरकारकडे केली आहे. या आधी 90 टक्के पाणी गळती थांबली असल्याचा दावा केला होता. परंतु, येथील भिंतीतून येणारे पाणी हे टेमघर धरणाच्या पाणी गळतीची साक्ष देत आहे.

2000 साली बांधण्यात आलेल्या टेमघर धरणातून 2016 साली मोठ्या प्रमाणात गळती समोर आली. यामुळे दहा अधिकाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले, ही समस्या पाहता 2017 साली जलसंपदा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. धरण बांधण्याचे काम सोमा एंटरप्रायजेसला देण्यात आले.

PCMC News : महापालिकेतर्फे 24, 25 जानेवारी रोजी जल्लोष शिक्षणाचा उपक्रम

धरण उत्तम बांधल्याने तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांचा (Temghar Dam) सत्कारही केला. मात्र, 2017 मध्ये धरणाच्या ग्राऊंटिंगचे काम न केल्याने गळती होत असल्याचे समोर आले. त्यानंतर 90 टक्के झालेले गळती थांबवण्याचे काम मात्र आजतागायत 100 टक्के झाले नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? एवढे वर्ष होत असलेली गळती थांबणार कधी? हे प्रश्न निरुत्तर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.