BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad :  ‘आझमभाई आता कुठं, आता कोणता पक्ष’?, अभिनेते नाना पाटेकरांनी घेतली फिरकी

एमपीसी न्यूज – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा काँग्रेस, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस,  भाजप आणि आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमलेले पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फिरकी  घेतली.  आझमभाई आता कुठं, आता कोणता पक्ष’ असे नानांनी विचारणा करताच पानसरे यांनी ‘आता राष्ट्रवादी पक्ष’ असे म्हटले. यावरून सभागृहात जोरादार हशा पिकला.
कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत झाली. प्रसिद्ध मुलाखतकार व संवादक समीरन वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली.
सुरुवातीच्या काळात माधव लिमये यांच्याकडे मी मुकादम म्हणून काम करत होतो. त्यावेळी लिमये यांनी फकिरभाई पानसरे यांच्या घराचे काम केले आहे. बांधकामावर मुकादम म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात काम करत असताना मी दर आठवड्याला कामगारांचा पगार वाटायचो. तेंव्हापासून पिंपरी-चिंचवड शहराशी नाळ जोडली आहे. पानसरे यांच्या घराचे छत ठोकल्याचे अजून आठवते, अशा आठवणींना नानांनी उजाळा दिला.
ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे कार्यक्रमाच्या सभागृहात आले. त्यानंतर नानांनी पानसरे यांना ‘आझमभाई आता कुठं, आता कोणता पक्ष’ असे म्हटले. त्यावर पानसरे यांनी ‘आता राष्ट्रवादी पक्ष’ असे म्हटले. यावरून सभागृहात पुन्हा हशा पिकला. अनेक कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. ते लक्षात राहत नाही, त्यामुळे विचारावे लागते, असे स्पष्टीकरण देखील नानांनी दिले.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like