22.2 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 16, 2022

Ghotawade Fire : स्वयंपाक करताना सिलेंडरला लागली आग, तेवढ्यात… वाचा पुढे काय घडले?

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – घोटावडे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक जवळील बिल्डिंग जवळ सिलेंडरला अचानक आग (Ghotawade Fire) लागली, मात्र हिंजवडी फायर ब्रिगेडचे कर्मचारी वेळेत पोहोचले आणि ही दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीच हानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव येथील एका बिल्डिंग मध्ये काही मजदूर रूममध्ये भाड्याने राहतात. संध्याकाळी सुमारे 6 वा घरी जेवण बनवत असताना 4 किलोग्रॅमच्या छोट्या सिलेंडरला गॅस गळतीमुळे आग लागली. घरामध्ये आग पसरू नये किंवा स्फोट होऊ नये म्हणून त्यांनी तात्काळ त्या सिलेंडर भोवती कपडा गुंडाळून त्याला ओढत खाली तळ मजल्यावर आणले.

दरम्यान, हिंजवडी एम आय डी सी टप्पा क्रं 3 च्या फायर ब्रिगेडला संध्याकाळी 6.15 वा वर्दी मिळाली. घटनास्थळी एक बंब व कर्मचारी वेळीच पोहचले व आग विजवली. सुमारे 20 ते 25 मिनिटांमध्ये त्यांनी आग विझवून सिलेंडरला थंड केले. त्यानंतर लीडींग फायरमन धनंजय भक्त यांनी तेथील रहिवाश्यांना सिलेंडर स्फोटामुळे होणारे नुकसान व ते कसे टाळावे याबद्दल प्रबोधन केले.

जाला जास्तीत जास्त योगदान देण्याचा विचार करतो त्याचे जीवन कृतार्थ ठरते – यजुर्वेंद्र महाजन

अग्निशमन केंद्राचे कर्मचारी उशिरा पोहोचले असते तर सिलेंडरचा स्फोट होऊन जीवित व वित्त हानी झाली असती. आग वेळेत विजवल्याने मोठी जीवित व वित्त हानी टळली असे स्थानिकांनी म्हटले आहे.

फायरमन अमर भाडळकर, गणेश पवार व आप्पा गदादे, ड्राइवर प्रथमेश भिवटे व मोनीष नाईक यांनी सदर आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

Maharashtra Political Crisis: शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश

spot_img
Latest news
Related news