LONIKAND NEWS : जिवंत असतानाही आत्याला मयत दाखवले आणि जमीन परस्पर विकली, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्याच्या लोणीकंद परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस. 77 वर्षीय आत्या जिवंत असतानाही ती 1983 सालीच मयत झाल्याचे दाखवून कोर्टात मृत्यूचा दाखला दाखल केला. त्याआधारे सातबारा व फेरफारला वारस म्हणून नोंद करून फिर्यादीची वडीलोपार्जित जमीन परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी सखुबाई गेनबा ओव्हाळ (वय 77) यांनी तक्रार दिल्यानंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात. विनोद रामचंद्र नितनवरे, सत्यभामा रामचंद्र नितनवरे, वंदना चंद्रकांत जाधव आणि वृषाली विनायक कदम या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद नितनवरे हा फिर्यादीचे भावाचा मुलगा आहे. वरील सर्व आरोपींनी फिर्यादी हे जिवंत आहेत हे माहीत असतानाही ते 1 मे 1983 रोजी मयत झाल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले. त्यानंतर फौजदारी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून कोलवडी ग्रामपंचायतमध्ये फिर्यादीच्या मृत्यूची नोंद केली.

त्याआधारे सातबारा व फेरफार ला वारस म्हणून स्वतःच्या नावाची नोंद केली आणि फिर्यादीची वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीची फसवणूक करून विकली. न्यायालयाच्या आदेशानुसार लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.