Pune News: खेळता खेळता तीन वर्षाचं चिमुरडं विहिरीकडे गेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

एमपीसी न्यूज: बारामती तालुक्यातील संपूर्ण गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली. खेळता खेळता तीन वर्षाचा चिमुरडा विहिरीकडे गेला आणि तोल जाऊन पाण्यात पडला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अधिराज सागर आहेरकर असं या दुर्देवी चिमुरड्याचं नाव आहे. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, अधिराज घराबाहेर अंगणात खेळत होता. तर घरातली वडीलधारी मंडळी आपल्या कामात व्यस्त होती. यावेळी त्यांना विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. याच दरम्यान अधिराज च्या वडिलांना अधिराज जवळपास दिसत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी विहिरीत जाऊन पाहिले असता त्यांना बुडत असताना अधिराज दिसला. त्यांनी अधिराज ला विहिरीबाहेर काढून बारामती शहरातील शासकीय रुग्णालयात नेलं. परंतु डॉक्टरांनी तपासाअंती त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

अधिराजच्या अशाप्रकारे अकाली जाण्याने आहेरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तर संपूर्ण बुऱ्हाणपूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.