WHO Alert : आठवड्याला 55 व त्यापेक्षा अधिक तास काम करणं ठरु शकते जीवघेणे

जास्त तास काम केल्याने स्ट्रोक तसंच हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यूचा धोका

एमपीसी न्यूज – सध्या सर्व जग कोरोना संसर्गाचा सामना करत आहेत. अशात आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आठवड्याला 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणं आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेतील पर्यावरण, हवामान बदल आणि आरोग्य विभागाच्या प्रमुख मारिया यांनी सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसारित केलेल्या बातमीनुसार, जास्त तास काम करणं अनेकांसाठी जीवघेणं ठरत आहे. 2016 मध्ये जास्त तास काम केल्यामुळे 7 लाख 45 हजार लोकांचा स्ट्रोक तसंच हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला.

2000 च्या तुलनेत ही वाढ 29 टक्क्यांनी जास्त आहे. आठवड्याला 55 किंवा त्यापेक्षा जास्त जास्त तास काम केल्यामुळे 2016 मध्ये 3 लाख 98 हजार लोक स्ट्रोक तर, 3 लाख 47 हजार लोक हृदयाशी संबंधित आजारांमुळे दगावले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पुरुषांवर याचा जास्त परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. मृतांपैकी 72 टक्के पुरुष आहेत. 194 देशांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार आठवड्याला 35 ते 40 तास काम करण्याच्या तुलनेत 55 किंवा त्याहून जास्त तास काम केल्याने स्ट्रोकची शक्यता 35 टक्के तर ह्रदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होण्याची शक्यता 17 टक्क्यांनी वाढते. हा अभ्यास 2000 ते 2016 दरम्यान करण्यात आलेला असून कोरोना काळाचा समावेश नाही.

जगात जास्त तास काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. सध्या हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या 9 टक्के एवढं आहे. 55 किंवा त्याहून जास्त तास काम केल्याने मृत्यूचा धोका वाढतो त्यामुळे, कामाचे तास कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मर्यादित कामाच्या तासांबाबत सरकारी नियमावली तयार करणे, कामाचे तास वाटून घेणे असे उपाय आरोग्य संघटनेने सुचवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.