Pune : ‘पीएमपीएमएल’ संचालक पदावर कोणाची वर्णी लागणार?

एमपीसी न्यूज – ‘पीएमपीएमएल’ संचालक पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे. सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे नाव जाहीर केल्यानंतर लगेचच ‘पीएमपीएमएल’ संचालकाचेही नाव जाहीर करण्यात येणार होते.

मात्र, इच्छुक नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हे नाव जाहीर होऊ शकले नाही. राज्यसभेचे खासदार संजय नाना काकडे गटाला हे पद मिळणार असल्याचे बोलले जात होते. नगरसेवक शंकर पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण, त्यांनी ऐनवेळी हे पद नाकारल्याचे समजते. नगरसेवक प्रवीण चोरबेले, धंनजय घोगरे, महेश वाबळे, उमेश गायकवाड, श्रीकांत जगताप यांच्याही नावांची चर्चा आहे. जानेवारी 2020 मध्ये पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड होणार असल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.