Pune News : पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण ? थोड्याच वेळात निवड जाहीर होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निर्विवाद विजय मिळवला आहे. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून या बैठकीनंतर अध्यक्षाची निवड घोषित केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने या बँकेवर वर्चस्व निर्माण केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदासाठी अशोक पवार विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवार कोणाला संधी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली तरी एका जागेवर मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. सुरेश घुले यांच्या विजयासाठी स्वतः अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. प्रचार सभेचे वेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहनही त्यांनी केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.